![]()
आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना मध्यरात्री रस्त्यातच अडवून त्यांना धमकावण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. पोलिसांचा वापर करून विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जात असून, ही दडपशाही त्वरित थांबवावी आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. “ही कुठल्या प्रकारची लोकशाही?” विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावरून राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “आदिवासी विद्यार्थी आपल्या मागण्या शांततेच्या मार्गाने मांडण्यासाठी आझाद मैदानावर येत होते. मात्र, त्यांना रात्री ३ वाजता वाटेतच अडवण्यात आले. हे कुठल्या लोकशाहीत बसते?” विद्यार्थ्यांचे फोटो काढले गेले, त्यांना ‘तुमच्यावर केसेस करू’ असे धमकावले गेले आणि त्यांची बसही ताब्यात घेण्यात आली, असे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. सरकारवर भीतीपोटी कारवाईचा आरोप कोणतेही आंदोलन सुरू होण्याआधीच ते अशा प्रकारे चिरडण्याचा प्रयत्न होत असेल, तर सरकार नेमके कशाला घाबरत आहे, असा थेट सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. आदिवासी विकास मंत्री आणि संबंधित आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणे हा या विद्यार्थ्यांचा घटनात्मक आणि संवैधानिक अधिकार आहे. त्यांच्या या मागणीवर चर्चा करण्याऐवजी किंवा त्यांच्याशी संवाद साधण्याऐवजी राज्य सरकार पोलिसी बळाचा वापर करून त्यांचा आवाज दाबत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांना थेट आवाहन या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी विजय वडेट्टीवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले आहे. “मुख्यमंत्री साहेब, तुम्ही स्वतः या विद्यार्थ्यांना भेटा, त्यांचे म्हणणे ऐकून घ्या आणि त्यांच्यावर होणारी ही पोलिसी दडपशाही त्वरित थांबवा,” अशी मागणी त्यांनी केली आहे. या घटनेमुळे आता आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून राज्यातील राजकीय वातावरण आणि विरोधी पक्ष आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वडेट्टीवार यांची पोस्ट.. हेही वाचा.. एक दिवस राज ठाकरे अमितचे वडील म्हणून ओळखले जातील:गर्जना मोर्चानंतर दिग्दर्शक केदार शिंदेंची पोस्ट चर्चेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली रविवारी पार पडलेल्या मोर्चाने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठे लक्ष वेधून घेतले. या मोर्चामध्ये राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचाही सक्रिय सहभाग पाहायला मिळाला. या मोर्चातील अनेक क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, यातच प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी अमित ठाकरे यांच्याबद्दल केलेली एक खास पोस्ट सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरली आहे. या पोस्टमधून त्यांनी अमित यांच्या राजकीय भवितव्यावर मोठा विश्वास व्यक्त केला आहे. सविस्तर वाचा
Source link
आदिवासी विद्यार्थ्यांना मध्यरात्री अडवून पोलिसांकडून धमक्या:विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप; दडपशाही थांबवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी