Headlines

लातूरच्या गांधी मार्केटमध्ये भीषण आग:अग्निशमन दलाच्या तत्परतेने टळला मोठा अनर्थ, लाखोंचे साहित्य जळून खाक




लातूर शहरातील वर्दळीच्या मानल्या जाणाऱ्या गांधी मैदान (गांधी मार्केट) परिसरात एका इलेक्ट्रिकल्सच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ‘पाठक इलेक्ट्रिकल्स’ आणि ‘लक्ष्मी इलेक्ट्रिकल्स’मध्ये लागलेल्या या आगीत दुकानातील केबल्स, वायर्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, अग्निशमन दलाने वेळीच धाव घेत आग विझवल्याने शेजारील दुकाने सुरक्षित राहिली आणि मोठा अनर्थ टळला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास भडका या घटनेबाबत माहिती देताना अग्निशमन दलाचे जवान शेख जे. बी. यांनी सांगितले की, “गांधी मार्केटमधील पाठक इलेक्ट्रिकल्स आणि लक्ष्मी इलेक्ट्रिकल्समध्ये आग लागल्याची माहिती आम्हाला रात्री १० वाजून ३१ मिनिटांनी मिळाली. गांधी चौक येथील स्थानिक पाण्याच्या टाकीचे प्रमुख आकाश सावंत यांनी आम्हाला या आगीबाबत सतर्क केले. माहिती मिळताच आमची टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली आणि आग विझवण्याचे काम सुरू केले.” १७ ते १८ जवानांच्या मदतीने आग आटोक्यात ही आग अत्यंत भीषण होती आणि ती दुकानाच्या पुढच्या आणि मागच्या अशा दोन्ही बाजूंनी वेगाने पसरत होती. दुकानात मोठ्या प्रमाणावर केबल्स, वायर्स आणि विविध इलेक्ट्रिकल उपकरणे ठेवलेली असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. मात्र, अग्निशमन दलाचे सुमारे १७ ते १८ जवान घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून या भीषण आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. शेजारील दुकाने वाचली “आम्ही त्वरित आणि वेगाने आग विझवल्यामुळे शेजारील दुकानांना या आगीची झळ बसली नाही; अन्यथा ही आग आजूबाजूच्या दुकानांमध्ये पसरून मोठे नुकसान झाले असते,” असेही जवान शेख यांनी स्पष्ट केले. वेळीच आग आटोक्यात आल्याने परिसरातील व्यापाऱ्यांनीही सुटकेचा निश्वास टाकला आहे. रात्रीच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे गांधी चौक परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हेही वाचा.. राज्यात ऑक्टोबर हीटचा कहर, हवामान विभागाचा अलर्ट:मुंबईचा पारा 36 अंशांवर, अकोल्यात सर्वाधिक उष्णता राज्यातून मान्सूनने परतीची वाट धरल्यानंतर आता उन्हाचा कडाका अचानक वाढू लागला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा चढल्याने नागरिकांना ‘ऑक्टोबर हीट’चा जोरदार चटका बसत आहे. वाढत्या उष्णतेच्या आणि उकाड्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट हवामानाचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. एकीकडे उन्हाचा चटका आणि दुसरीकडे पावसाअभावी निर्माण झालेली भीषण दुष्काळी परिस्थिती, यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून हाताला काम नसल्याने शेतमजुरांनी पोटापाण्यासाठी शहरांकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *