![]()
विवाह समारंभातील अनिष्ट चालीरीती, वाईट प्रथांना आळा घालण्यासाठी विवाह आचारसंहितेचे पालन करणे काळाची गरज आहे. समाज हा अनुकरणप्रिय आहे. हे लक्षात घेऊन समाजधुरीण, पुढारी व लोकप्रतिनिधींनी आपल्या कुटुंबातील विवाह आचारसंहितेनुसार पार पाडावेत, असा आग्रह कर
.
अनेक विवाह सोहळ्यांमध्ये विविध प्रथा पार पाडण्यात येतात. अनेकदा तर विवाह नियोजित वेळेपेक्षा एक-दोन तास उशिरा लागतात. अनेकांना ताटकळत बसावे लागते. त्यामुळे विवाह समारंभात वेळेसह अन्य आचारसंहितेचे पालन होणे आवश्यक असल्याची मागणी समाजातून झाली. दरम्यान अकोट येथे मध्यस्थीच्या वार्षिक सभेत विवाह आचारसंहितेनुसार पार पाडावे, असा ठराव मंजूर करण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब फोकमारे होते. मध्यस्थी मंडळाच्या अकोला, बुलडाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळ येथील शाखांचे पदाधिकारी व सदस्य तथा समन्वयक उपस्थित होते. या सभेत मध्यस्थी मंडळाचा वार्षिक अहवाल सचिव सुरेश कराळे यांनी सादर केला. जमाखर्चाचा अहवाल सहकोषाध्यक्ष राममूर्ती वालसिंगे यांनी तर मध्यस्थीच्या कार्यविस्ताराबाबत मंडळाचा मानस नंदकिशोर हिंगणकर सभेत व्यक्त केला. या सभेत नानासाहेब हिंगणकर, बाळकृष्ण आमले, सुधीर लुंगे, श्रीराम वानखडे, डी. ओ. म्हैसने आदींनी मार्गदर्शन केले. सभेला प्रा. गजानन चोपडे, पुणे विभागीय शाखेचे कार्याध्यक्ष कॅप्टन सुनील डोबाळे, अमरावती जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण आमले, यवतमाळ जिल्हाध्यक्ष विलासराव खेळकर, वाशीम जिल्हाध्यक्ष समाधानराव उपाध्ये व सुधीर लुंगे, अकोल्याचे श्रीराम वानखडे व रामेश्वर सपकाळ, बुलडाणा शाखेचे अमृतराव वाघ, मध्यस्थीचे उपाध्यक्ष अशोकराव पाचडे, दिलीप हरणे, अनिल कोरपे, महादेवराव सावरकर, नागोराव कुलट, प्रा. साहेबराव मंगळे, ज्योती कुकडे, वृंदा मंगळे यांच्यासह जिल्हा व तालुकास्तरीय शाखांचे पदाधिकारी सदस्य व समन्वयक उपस्थित होते. आभार रामेश्वर सपकाळ यांनी मानले.
श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेअंतर्गत कार्यरत मध्यस्थी वधू वर सूचक मंडळाच्या राज्यभरातील शाखांचे पदाधिकारी सदस्य व समन्वयक यांच्या श्रीक्षेत्र श्रद्धा सागर येथे पार पडलेल्या वार्षिक आमसभेत या विषयावर विचारमंथन झाले. विचारविनिमय करण्यात आला. त्यानंतर याबाबतचा हा समाज हिताचा ठराव पारित करण्यात आला.तथापि मध्यस्थी मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी याचे आचरण सर्वप्रथम आपल्यापासून करावे, असेही मत सभेत मांडण्यात आले. या ठरावाचा सकारात्मक संदेश गेला आहे.