![]()
तालुक्यातील वाघोडा, शेलूनटवा, वाईबोथ परिसरात वाघाच्या हालचालींचे पुरावे आढळल्याने शेतकरी, शेतमजुरांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. वाघोडा येथील शेतकरी सुरेश गावनर यांच्या शेतात शेत मजुरांना वाघाच्या पावलांचे ठसे आढळले. या घटनेची माहिती मिळताच वन विभाग
.
वाघाचा शोध घेण्यासाठी लावलेल्या कॅमेऱ्यांमधून मिळणाऱ्या छायाचित्रे व हालचालींच्या नोंदीवर वन विभागाचे लक्ष असून, पुढील काळात वाघाची हालचाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेलूनटवा, वाघोडा व वाईबोथ परिसरातील शेतकऱ्यांनी घाबरून न जाता मात्र पूर्ण खबरदारी घेऊन शेतीची कामे करावीत, असे वन विभागाकडून सांगण्यात आले.
सुमारे एक महिना आधी शिरजगाव, सोनोरी, मोर्शी तालुक्यातील भांबोरा येथे वाघिणीने तीन बळी घेतले होते. याव्यतिरिक्त १९ ऑगस्टला वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथील नरसिंगपूर येथे एक असे एकूण चार बळी घेतले होते. त्यानंतर आता पुन्हा नांदगाव खंडेश्वर तालुक्यात वाघाची दहशत पसरली असून, नेर, वडाळी, चांदूर रेल्वेचे वन विभाचे पथक वाघाच्या शोधात आहे.