Headlines

बुद्धिबळ व तायक्वांदो अन् मैदानी स्पर्धेमध्ये रेसिडेन्शियलचा डंका:जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी ‎खेळाडूंची झाली निवड‎




क्रीडा व युवा संचालनालय, जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तालुकास्तरीय बुद्धीबळ, तायक्वांदो व मैदानी क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांमध्ये रेसिडेन्शियल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, शेवगावच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली. शेवगाव इंग्लिश मीडियम स्कूल येथे झालेल्या १४, १७ व १९ वर्षे वयोगटांतील मैदानी स्पर्धेत तालुक्यातील सुमारे ४०० विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये हायस्कूलच्या खेळाडूंनी विविध प्रकारांत पदके पटकावली. १४ वर्षे वयोगट : वैष्णवी साळवे हिने ८० मीटर हर्डल्समध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. १७ वर्षे वयोगट : भक्ती डोंगरे हिने ४०० मीटर धावणे व तिहेरी उडीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. तेजस्विनी मिसाळ हिने तिहेरी उडीत द्वितीय क्रमांक, सार्थक साखरे याने भालाफेकीत तृतीय व तिहेरी उडीत द्वितीय, श्रीराज डमाळ याने तिहेरी उडीत प्रथम, संग्राम खैरे याने हातोडाफेकीत प्रथम, ओंकार आंधळे याने हातोडाफेकीत द्वितीय, तर किरण गुंठे याने १०० मीटर हर्डल्समध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. १९ वर्षे वयोगट : श्रद्धा भोसले हिने १५०० व ३००० मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक, समीक्षा लांडे हिने ८०० मीटर धावणे व तिहेरी उडीत प्रथम क्रमांक, ऋतिका दौड हिने लांब उडीत प्रथम, कृष्णा साळुंके याने १५०० व ४०० मीटर धावण्यात प्रथम, सुमित बोडखे याने तिहेरी उडीत प्रथम, तर कुणाल गुंठे याने तिहेरी उडीत द्वितीय क्रमांक मिळवला. बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ थोटे याने प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत राजलक्ष्मी लांडे, निधी पगारे, सोहम मोरे, शंभो रसाळ या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. या खेळाडूंना क्रीडाशिक्षक रोहिदास जाधव व अजझर पठाण यांचे मार्गदर्शन लाभले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *