![]()
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त त्याच्या एका विधानामुळे सध्या नव्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एका टॉक शोमध्ये बोलताना त्याने “मला आता भारतात शांतता वाटत नाही” असे विधान केल्याचा दावा केला जात आहे. या विधानावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात असून, भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांनी संजय दत्तवर अत्यंत शेलक्या शब्दांत निशाणा साधला आहे. वाढता वाद पाहता संजय दत्तने स्वतः पुढे येत यावर स्पष्टीकरण दिले आहे. परिणय फुकेंची बोचरी टीका संजय दत्तच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते परिणय फुके यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “संजय दत्तची विचार करण्याची क्षमता आता राहिलेली नाही, त्याच्यावर वयाचा परिणाम दिसू लागला आहे. त्याने अलिकडेच दारूचे काही ब्रँड्स लाँच केले आहेत, कदाचित त्याचाच हा परिणाम असावा. जर त्याला भारतात शांतता मिळत नसेल, तर कदाचित पाकिस्तानमध्ये किंवा येरवडा जेलमध्ये त्याला शांतता मिळेल. तसे असेल तर त्याने तिथेच निघून जावे.” नेमका वाद काय आहे? गांधी जयंतीच्या निमित्ताने शेखर सुमन यांच्या ‘शेखर टुनाईट’ (Shekhar Tonite) या टॉक शोमध्ये संजय दत्त सहभागी झाला होता. या शोमध्ये एका गमतीशीर सेगमेंटअंतर्गत त्याने पाच मिनिटांसाठी भारताचा ‘पंतप्रधान’ असल्याची कल्पना करत आपल्या प्रसिद्ध ‘मुन्नाभाई’ स्टाईलमध्ये संवाद साधला. याच संवादादरम्यान त्याने सध्याच्या देशातील परिस्थितीवर भाष्य करताना “देशात आता शांतता वाटत नाही” असे विधान केल्याचे समोर आले, ज्यावरून हा वाद उफाळून आला. संजय दत्तचे ‘एक्स’वरून स्पष्टीकरण या विधानावरून सोशल मीडियावर बहिष्कार आणि टीकेची झोड उठल्यानंतर संजय दत्तने त्याच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावरून एक सविस्तर नोट शेअर करत आपली बाजू मांडली आहे. संजय दत्तने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “माझ्या विधानामुळे कोणत्याही व्यक्ती, समाज किंवा संस्थेच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता, हे मी स्पष्ट करू इच्छितो. मी जे काही बोललो, ते एका ‘स्क्रिप्टेड’ संवादाचा भाग होते आणि ते केवळ एका हलक्याफुलक्या, गमतीशीर उद्देशाने म्हटले होते.” अभिनेत्याने पुढे म्हटले आहे की, या संवादामागचा मूळ उद्देश हा ‘मुन्नाभाई’ चित्रपटातील ‘गांधीगिरी’सारखाच होता, ज्यातून प्रेम, आपुलकी, एकता आणि सदिच्छा यांचा संदेश द्यायचा होता. परंतु, दुर्दैवाने माझ्या शब्दांचा मूळ संदर्भाबाहेर जाऊन चुकीचा अर्थ काढला गेला.” या गैरसमजाबद्दल त्याने तीव्र निराशाही व्यक्त केली आहे. हेही वाचा.. संजय दत्तला हातकड्या घातलेले पाहून वडील रडू लागले: अभिनेता म्हणाला- ते धक्क्यात होते, अधिकारी म्हणाला- तुरुंगात सिगारेट मिळत नाही, मजेशीर उत्तर दिले संजय दत्तने अलीकडेच शेखर सुमन यांच्या ‘शेखर टुनाइट’ शोमध्ये तुरुंगातील दिवस आठवताना सांगितले की, अटकेच्या वेळी त्याचे वडील सुनील दत्त यांच्यासमोर त्याला हातकड्या घालण्यात आल्या होत्या. त्यावेळी वडिलांच्या डोळ्यांत अश्रू आले होते. संजय दत्तला १९९३ मध्ये अटक करण्यात आली होती. बेकायदेशीर पद्धतीने शस्त्रे बाळगल्याच्या आरोपाखाली त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. नंतर तो दहशतवादाच्या आरोपांतून निर्दोष मुक्त झाला, मात्र शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरला आणि अनेक वेळा तुरुंगात गेला. सविस्तर वाचा
Source link
भारतात शांतता वाटत नसेल, तर पाकिस्तानात किंवा येरवडा जेलमध्ये जा:भाजप नेते परिणय फुकेंचा संजय दत्तवर हल्लाबोल