14 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

अनेक दशकांच्या विलक्षण कारकिर्दीनंतरही मेगास्टार अनिल कपूर हे त्यांचा सिनेमॅटिक प्रवासात कायम चर्चेत असतात. आणखी एका मोठा टप्पा पार करत त्यांना सुभेदार मधील त्यांच्या अभिनयासाठी Asian Academy Creative Awards मध्ये त्यांना 2026 नॅशनल विनर बेस्ट अभिनेता इन लीडिंग रोल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
आपल्या प्रियजनांचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक भ्रष्टाचाराविरोधात उभा राहत नागरी जीवनाशी जुळवून घेणाऱ्या निवृत्त सैनिक अर्जुन मौर्याची कपूर यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षक आणि समीक्षक दोघांच्याही मनाला खोलवर भिडली आहे. या चित्रपटाने भारतासाठी Best Feature Film हा पुरस्कारही जिंकला आहे.
Asian Academy Creative Awards ने सोशल मीडियावर या यशाचा गौरव केला असून त्यांनी एका पोस्टमध्ये लिहिले, “अभिनंदन, अनिल कपूर! ‘Subedaar’ मधील त्यांच्या उल्लेखनीय अभिनयामुळे त्यांना 2026 National Winner – Best Actor in a Leading Role हा पुरस्कार मिळाला आहे. 3 डिसेंबर रोजी होणाऱ्या Asian Academy Creative Awards Grand Gala Final मध्ये ते भारताचे प्रतिनिधित्व करतील.
भारतीय सिनेमातील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक म्हणून मिळवलेल्या यशावर विसंबून न राहता ते सातत्यपूर्ण काम करत आहेत. या प्रवासाबद्दल बोलताना अनिल कपूर यांनी दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी, आपल्या सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले आणि हा सन्मान त्यांच्या कारकिर्दीत विशेष स्थान राखतो कारण हा चित्रपट बनवताना त्यांनी आणि संपूर्ण टीमने मनापासून घेतलेली मेहनत आणि जिद्द यात प्रतिबिंबित होत अस ते सांगतात. 3 डिसेंबर रोजी हा सोहळा पार पडणार असून मेगास्टार अनिल कपूर जागतिक मंचावर अभिमानाने भारतीय ध्वज घेऊन उभे राहतील.