परंपरागत शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तंत्रज्ञान आता थेट शेताच्या बांधावर पोहोचले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (DBATU) विभा
.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आयटी सेमिनार हॉलमध्ये पार पडलेल्या या परिषदेत देशभरातील कृषी शास्त्रज्ञ, तंत्रज्ञान तज्ज्ञ, संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी सहभाग नोंदवत भविष्यातील ‘स्मार्ट शेती’चे चित्र स्पष्ट केले.
संकल्पना आणि उद्देश: शेतीपुढील आव्हानांवर तंत्रज्ञानाचा प्रहार
दीनदयाळ उपाध्याय संचलित कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाईचे प्रकल्प संचालक डॉ. उपेंद्र कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून या महत्त्वपूर्ण परिषदेची आखणी करण्यात आली होती. हवामान बदल, पिकांवरील रोग, उत्पादकतेतील घट आणि वाढता खर्च यांसारख्या शेतीपुढील गंभीर समस्यांवर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ठोस व व्यावहारिक उपाय शोधणे, हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता.
दिग्गजांच्या उपस्थितीत दिमाखदार उद्घाटन
परिषदेचे उद्घाटन DBATU चे कुलसचिव डॉ. एस. एम. पोरे, GECA चे प्राचार्य डॉ. संजय डांभारे आणि DBATU कार्यकारी परिषदेचे सदस्य प्रवीणजी सरदेशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. डॉ. ब्रिजेश अय्यर यांनी परिषदेच्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाची पार्श्वभूमी मांडली. प्रा. विनीतकुमार डोंगरे (ठाकूर विद्यापीठ, मुंबई) यांनी सूत्रसंचालन केले. उद्घाटनपर भाषणात डॉ. सचिन पोरे यांनी संशोधन व विकासाच्या (R&D) क्षेत्रात विद्यापीठाची अग्रगण्य भूमिका विशद केली. डॉ. संजय डांभारे यांनी कृषी व उद्योग क्षेत्रातील परस्पर सहकार्याचे (Industry-Academia Collaboration) महत्त्व अधोरेखित करत शैक्षणिक संशोधनाचा फायदा थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, असा सूर आळवला.
‘Innovate, Collaborate, Empower’ – भविष्यातील शेतीचे तीन स्तंभ
‘नवोन्मेष, सहकार्य आणि सक्षमीकरण’ या मुख्य सूत्रावर आधारित या परिषदेत तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मार्गदर्शन केले. त्यात राहुल राय (सिंगेंटा समूह), हेमंत साल्मोकर (डेटा डिलिव्हरी), श्री. कुलकर्णी (फिनॅबिलिटी), मनोज देशमुख (ElevaTech-Pune) या तज्ज्ञांनी शेतीतले आगामी जग कसे असेल, हे सांगितले.
या तज्ज्ञांनी शेतीमध्ये AI चा वाढता वापर, रोगांचे वेळेत निदान, अचूक हवामान अंदाज, आणि बाजारातील मागणीचे विश्लेषण यावर सविस्तर मार्गदर्शन केले. केवळ AI वर न थांबता Internet of Things (IoT) आणि Data Analytics यांची सांगड घालून शेती अधिक उत्पादक आणि शाश्वत कशी करता येईल, याचे प्रात्यक्षिक मॉडेलही मांडण्यात आले.
विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा: थेट ‘इंटर्नशिप’द्वारे प्रोजेक्ट्सची अंमलबजावणी!
परिषदेच्या उत्तरार्धात आयोजित विचारमंथन (Brainstorming) सत्रात उपस्थित संशोधक आणि प्राध्यापकांनी कृषी क्षेत्रातील विविध समस्यांवर सखोल चर्चा केली. कार्यक्रमाच्या सांगता सत्रात आभार मानताना DBATU चे कार्यकारी परिषद सदस्य प्रवीण सरदेशमुख यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली:
“ही परिषद केवळ चर्चेपुरती मर्यादित न राहता, यातील उपायांची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाईल. यासाठी विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून ‘विशेष इंटर्नशिप उपक्रम’ राबवला जाईल, ज्याद्वारे विद्यार्थी थेट शेतात जाऊन तंत्रज्ञान विकसित करतील.”

या परिषदेला प्राध्यापक, विद्यार्थी, तरुण संशोधक आणि कृषी-उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, मराठवाड्यातील कृषी-तंत्रज्ञानाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.