![]()
गणेशोत्सवाच्या काळात पंढरपूरच्या चंद्रभागा वाळवंटातील विसर्जन कुंडात तसेच नदी पात्रात, पाण्यात विसर्जित करण्यात आलेल्या शेकडो गणेशमूर्ती पाणी कमी झाल्याने उघड्यावर पडल्या आहेत. मूर्तींची विटंबना होऊ नये, यासाठी पंढरपूर नगरपालिकेने तातडीने मूर्ती संकलनाची मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वाळवंटातील उघड्यावर पडलेल्या गणेशमूर्ती बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवल्या. आतापर्यंत चार ट्रेलरमधून ५०० हून अधिक गणेशमूर्ती वाळवंटातून बाहेर काढण्यात आल्या असून, त्यांना झाकून ठेवण्यात आले आहे. वाळवंटातील पाण्याची पातळी आणखी कमी होत गेल्यास ज्या गणेशमूर्ती उघड्यावर पडतील, त्या तत्काळ संकलित करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार आहेत. दरम्यान, भीमा नदीपात्रातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने विसर्जित मूर्ती उघड्यावर पडण्याचे प्रमाण वाढत आहे. नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी स्वतः वाळवंटात उघड्यावर पडलेल्या गणेशमूर्ती गोळा करून त्या सुरक्षितपणे हलवण्याच्या कामात सहभाग घेतला. मूर्तींची विटंबना होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येत असून, नगरपालिका कर्मचाऱ्यांकडूनही युद्धपातळीवर मूर्ती संकलनाची कार्यवाही सुरू आहे. उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे बाष्पीभवन वेगाने होत असून पाण्याची आणखी कांही दिवसात पातळी घटणार आहे. तेव्हा आणखी मूर्ती उघड्या पडतील. त्यावेळी पुन्हा तत्काळ अभियान राबवून मूर्तींची संकलन करण्यात येईल. नदीपात्रात मूर्तीची विटंबना होणार नाही याची काळजी घेण्यात येईल, असे नगराध्यक्ष भालके यांनी सांगितले. पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा संकलन करणार वाळवंटातील विसर्जन कुंडातील ५०० हून अधिक मूर्ती पाण्याअभावी उघड्या पडल्या आहेत. सोमवारी चार ट्रेलर मूर्ती बाहेर काढण्यात आल्या आहेत. मूर्तींची विटंबना होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेत आहोत. कर्मचाऱ्यांकडून मूर्त्या संकलीत करून सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवण्यात येतील. प्रणिता भालके, नगराध्यक्ष, पंढरपूर
Source link
चंद्रभागेत उघड्या पडलेल्या 4 ट्रेलर गणेशमूर्तींचे:नगरपालिकेने मूर्ती सुरक्षित ठिकाणी हलवल्या, नगराध्यक्षा उतरल्या नदीपात्रात