![]()
पुण्यात MPSC परीक्षांमधील कथित घोटाळे, पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील दिरंगाईच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सहभागी होत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला
.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला आता राजकीय रंग चढला असल्याचे पाहायला मिळत आहे. आंदोलनस्थळी पोहोचलेल्या रोहिणी खडसे यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार टीका करण्यासोबतच भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावरही थेट निशाणा साधला. खडसेंच्या या टीकेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, चित्रा वाघ यांनीही आक्रमक पवित्रा घेत सोशल मीडियाच्या माध्यमातून रोहिणी खडसेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
“काळ्याकुट्ट नकली भुवया घेऊन..”
रोहिणी खडसे यांनी आंदोलनस्थळावरून बोलताना सरकारमधील महिला नेतृत्वाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच चित्रा वाघ यांच्यावर टीका करताना खडसेंनी म्हटले की, “काळ्याकुट्ट नकली भुवया घेऊन.. अगं बाई तू ये” अशा शब्दांत जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला नौटंकी म्हणणाऱ्यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी येऊन विद्यार्थ्यांची व्यथा समजून घ्यावी. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील पालक आपल्या मुलांना अधिकारी बनवण्यासाठी कष्ट घेतात, असे खडसे याणणू यावेळी म्हटले.
‘तुतारी’च्या ‘पिपाणी’ने स्वतःच्या गिरेबानात डोकावून पहावं- चित्रा वाघ
रोहिणी खडसे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देतात चित्रा वाघ म्हणाल्या, माझ्यावर चिखलफेक करण्याआधी ‘तुतारी’च्या ‘पिपाणी’ने स्वतःच्या गिरेबानात डोकावून पहावं. तुमची नीतीमत्ता काय? खरं तर कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर मला बोलायला आवडत नाही. पण जेव्हा रोहिणी खडसे सारख्या जास्त शहाणपणा करतात राजकीय टीकेच्या सर्व पातळ्या ओलांडतात, तेव्हा त्यांना अशी आठवण करून द्यावीच लागते. MPSC च्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना विषय काय, आपण बोलतोय काय? याचं तरी भान ठेवायचं. केवळ टाळ्या मिळवण्यासाठी दुसऱ्या महिलेवर चिखलफेक करायची? असा सवाल वाघ यांनी उपस्थित केला.
‘हम किसीको छेडते नहीं, और अगर किसीने छेडा..’
पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, MPSC चे स्वप्न पाहणाऱ्या त्या तरुणांसमोर तुम्ही रेव्ह पार्टी आणि ड्रग्स प्रकरणात नाव आलेल्या स्वतःच्या पतीचाच आदर्श मांडत होतात का? ज्यांचे स्वतःचे पती अशा गाजलेल्या प्रकरणात अडकलेले आहेत त्यांनी दुसऱ्यांना संस्कार शिकवू नयेत. स्वतःचं घर काचेचं असताना, आमच्यावर दगड फेकायची चूक करू नका. कारण आमचा एकच नियम आहे, ‘हम किसीको छेडते नहीं, और अगर किसीने छेडा, तो उसे छोडते भी नहीं हें’, असा थेट इशारा वाघ यांनी रोहिणी खडसे यांना दिला आहे.