Headlines

तळवडेत क्रेन कोसळली, 8 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित:वीज यंत्रणेचे मोठे नुकसान; क्रेन मालकाविरुद्ध तक्रार दाखल




पुण्यातील तळवडे येथील जोतिबा मंदिरासमोर गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एक मोठी क्रेन रोहित्रावर कोसळली. या घटनेमुळे वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले असून, ८ हजार ६१० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. ही क्रेन २२ केव्ही देवी इंद्रायणी स्विचिंग स्टेशनला येणाऱ्या मुख्य वाहिनीवर पडल्याने हा बिघाड झाला. या बिघाडामुळे देहूगाव आणि तळवडे येथील २२ केव्ही वाहिन्यांवर अवलंबून असलेल्या ग्राहकांना फटका बसला आहे. यामध्ये १ हजार ९१० औद्योगिक आणि ६ हजार ७०० घरगुती ग्राहकांचा समावेश आहे. क्रेन कोसळल्याने एक रोहित्र आणि काही वीज खांब पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहेत. या घटनेनंतर संबंधित क्रेन मालकाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. तुटलेले खांब आणि तारा बदलण्याचे काम सध्या वेगाने सुरू असून, महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. महावितरणचा वीज कंत्राटी कामगारांना आर्थिक दिलासा महावितरण कंपनीने वीज कंत्राटी कामगारांना पूर्वीप्रमाणेच बोनस व रजेचे वेतन दरमहा अदा करण्याचा निर्णय परिपत्रक काढून घेतला. ही बाब राज्यातील महावितरण, महापारेषण व महानिर्मीती मधील वीज कंत्राटी कामगारांसाठी मोठा आर्थिक दिलासा देणारी असून महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने( संलग्न भारतीय मजदूर संघ ) या निर्णयाचे स्वागत केले आहे. महावितरणच्या औद्योगिक संबंध विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार नोव्हेंबर 2025 ते ऑक्टोबर 2026 या कालावधीतील बोनस व रजेचे वेतन एकत्रितरित्या ऑक्टोबर 2026 महिन्यात देण्याची पद्धत लागू करण्यात आली होती. मात्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ व सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अंतर्गत निर्धारित वेतन मर्यादा रकमेच्या व्याख्येत बदल झाल्यामुळे आता पुन्हा वीज कंत्राटी कामगारांना दरमहा वेतनात बोनस व रजेचे वेतन समाविष्ट करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश व महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने या बाबत प्रशासन,केंद्र सरकार, राज्य सरकार व ई.एस.आय कडे मागणी केली होती. तसेच नोव्हेंबर 2025 मध्ये केंद्रीय कामगार मंत्री मा.ना.मनसुख मांडवीय यांच्या समवेत दिल्ली येथे झालेल्या बैठकीत सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी ई.एस.आयसी वेतन मर्यादा वाढवणे बाबत आग्रही मागणी केली होती . नोव्हेंबर 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीतील थकीत बोनस व रजेचे वेतन माहे मे 2026 च्या वेतनात समाविष्ट करून अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून कपात झालेली प्रलंबित रक्कम सर्व वीज कंत्राटी कामगारांना परत मिळणार आहे. संघाच्या पाठपुराव्यामुळे व सातत्यपूर्ण संघर्षामुळे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी नमूद केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *