![]()
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २००व्या जयंतीनिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठातील डॉ. अण्णासाहेब शिंदे शासकीय कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली. ‘महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवन, कार्य व वारसा’ या विषयावरील स्पर्धेत ३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी पोस्टरच्या माध्यमातून महात्मा फुले यांचे स्त्रीशिक्षण, शेतकरी कल्याण, सामाजिक समता आणि समाजसुधारणेचे विचार प्रभावीपणे मांडले. महात्मा फुले यांचे विचार आजही समाजाला दिशा देतात. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव वाढते, असे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे यांनी सांगितले. कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. कैलास कांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाबद्दल समाधान व्यक्त केले, तर अक्षय ऊर्जा अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. विक्रम पाटील यांनी त्यांच्या कलात्मक सादरीकरणाचे कौतुक केले. कुलगुरू डॉ. विलास खर्चे, शिक्षण संचालक डॉ. साताप्पा खरबडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके आणि अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. डॉ. गणेश शेळके यांनी स्पर्धेचे समन्वयन केले. यावेळी प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Source link
पोस्टरमधून महात्मा फुले यांच्या विचारांचे दर्शन:कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात पोस्टर स्पर्धा