Headlines

नगरसूल–तारूर रेल्वे दुहेरीकरणासाठी 16 दिवसांचा ब्लॉक:25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबरदरम्यान अनेक गाड्या रद्द, काहींच्या फेऱ्या अंशतः रद्द तर नांदेडच्या 3 एक्स्प्रेस 70 ते 80 मिनिटे उशिराने




नगरसूल–तारूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाला वेग देण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेकडून 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2026 या कालावधीत तब्बल 16 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण तसेच सिग्नलिंगशी संबंधित विविध कामे करण्यात येणार आहेत. या कामांचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार असल्याने अनेक प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्यांच्या फेऱ्या ठरावीक स्थानकांदरम्यान अंशतः रद्द करण्यात आल्या असून, नांदेडहून धावणाऱ्या तीन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या 70 ते 80 मिनिटे उशिराने धावणार आहेत. जालना–नगरसूल पॅसेंजर, डेमूच्या फेऱ्या रद्द ब्लॉकच्या काळात जालना–नगरसूल मार्गावरील प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. गाडी क्रमांक 77619 जालना–नगरसूल पॅसेंजर आणि 77620 नगरसूल–जालना पॅसेंजर यांच्या 1, 3, 7, 8 आणि 10 डिसेंबरच्या फेऱ्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे 77621 जालना–नगरसूल डेमू आणि 77622 नगरसूल–जालना डेमू यांच्या 2, 4, 5, 6 आणि 9 डिसेंबरच्या फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत. चेन्नई, नरसापूर एक्स्प्रेसच्या फेऱ्या अंशतः रद्द ब्लॉकचा परिणाम लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांवरही होणार आहे. 16003 चेन्नई–नगरसूल एक्स्प्रेसची 6 डिसेंबरची रोटेगाव–नगरसूल फेरी अंशतः रद्द करण्यात आली आहे. तर 16004 नगरसूल–चेन्नई एक्स्प्रेसची 7 डिसेंबरची नगरसूल–रोटेगाव फेरी अंशतः रद्द राहणार आहे. 17231 नरसापूर–नगरसूल एक्स्प्रेसच्या 4 आणि 6 डिसेंबरच्या फेऱ्या रोटेगाव–नगरसूल दरम्यान अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच 17232 नगरसूल–नरसापूर एक्स्प्रेसच्या 5 आणि 7 डिसेंबरच्या फेऱ्या नगरसूल–रोटेगाव दरम्यान अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. 12787 आणि 12788 एक्स्प्रेसवरही परिणाम 12787 नरसापूर–नगरसूल एक्स्प्रेसच्या 30 नोव्हेंबर तसेच 1, 2, 3, 5, 7, 8 आणि 9 डिसेंबरच्या फेऱ्या रोटेगाव–नगरसूल दरम्यान अंशतः रद्द राहणार आहेत. तर 12788 नगरसूल–नरसापूर एक्स्प्रेसच्या 1, 2, 3, 4, 6, 8, 9 आणि 10 डिसेंबरच्या फेऱ्या नगरसूल–रोटेगाव दरम्यान अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. मनमाड–धर्माबाद एक्स्प्रेसही प्रभावित 17687 मनमाड–धर्माबाद आणि 17688 धर्माबाद–मनमाड एक्स्प्रेसच्या 1 ते 10 डिसेंबरदरम्यानच्या फेऱ्यांमध्येही बदल करण्यात आला आहे. या कालावधीत दोन्ही गाड्यांच्या फेऱ्या अनुक्रमे मनमाड–लासूर आणि लासूर–मनमाड दरम्यान अंशतः रद्द राहणार आहेत. याशिवाय 57652 मनमाड–नांदेड पॅसेंजरच्या 9 आणि 10 डिसेंबरच्या, तर 57651 नांदेड–मनमाड पॅसेंजरच्या 8 आणि 9 डिसेंबरच्या फेऱ्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. काचीगुडा–नगरसूल एक्स्प्रेसच्या फेऱ्यांमध्येही बदल 17661 काचीगुडा–नगरसूल एक्स्प्रेसच्या 3 ते 9 डिसेंबरदरम्यानच्या फेऱ्या रोटेगाव–नगरसूल दरम्यान अंशतः रद्द राहतील. त्याचप्रमाणे 17662 नगरसूल–काचीगुडा एक्स्प्रेसच्या 4 ते 10 डिसेंबरदरम्यानच्या फेऱ्या नगरसूल–रोटेगाव दरम्यान अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. नांदेडच्या तीन एक्स्प्रेस 70 ते 80 मिनिटे उशिराने दुहेरीकरणाच्या कामामुळे नांदेडहून धावणाऱ्या तीन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. 12753 नांदेड–निझामुद्दीन एक्स्प्रेस 1 आणि 8 डिसेंबर रोजी 80 मिनिटे उशिराने धावणार आहे. तर 12715 नांदेड–अमृतसर एक्स्प्रेस आणि 17618 नांदेड–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या 1 ते 10 डिसेंबरदरम्यान 70 मिनिटे उशिराने धावणार आहेत. दुहेरीकरणामुळे भविष्यात रेल्वे वाहतूक क्षमता वाढणार नगरसूल–तारूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीची क्षमता भविष्यात वाढण्यास मदत होणार आहे. दुहेरी मार्गासोबतच विद्युतीकरण आणि सिग्नलिंगची कामेही करण्यात येत असल्याने रेल्वे परिचालन अधिक सक्षम आणि गतिमान होण्याची अपेक्षा आहे. मात्र, कामाच्या कालावधीत गाड्या रद्द होणे, काही गाड्या अंशतः रद्द होणे तसेच काही एक्स्प्रेस उशिराने धावणार असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे प्रवाशांनी संबंधित गाडीचे सुधारित वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड मंडळाच्या जनसंपर्क विभागाने केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *