Headlines

14 वर्षांत 50 तक्रारी, 2 उपोषणांची दखल नाही:संभाजीनगरात शिक्षकाची आत्महत्या, चौघांवर एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा




मालमत्ता फसवणूक प्रकरणात १४ वर्षे पोलिसांकडे पाठपुरावा करून आणि ५० तक्रारी देऊनही न्याय न मिळाल्याने नैराश्यातून सिडको येथील फीनिक्स इंग्लिश स्पीकिंग क्लासचे संचालक मोहन शिवराम कोरडे (६०) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात विजय सांगवीकर, सुधा साने, उद्धव राऊत आणि संतोष जाधव यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २००६ मधील एका फसवणूक प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने २०१२ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. मात्र, तत्कालीन तपास अधिकाऱ्यांनी १४ वर्षे दोषारोपपत्र दाखल केले नाही. न्याय मिळवण्यासाठी मोहन कोरडे यांनी २००६ ते २०२५ या काळात प्रशासनाकडे ५० तक्रार अर्ज दिले. मुंबईच्या आझाद मैदानावर दोन वेळा आमरण उपोषण केले. मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांचे आदेश येऊनही स्थानिक पातळीवर कोणतीही कारवाई झाली नाही. अखेर कंटाळून २०२५ मध्ये त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सखोल तपासाचे आदेश दिल्यावर जुलै २०२६ मध्ये पोलिसांचा तपास सुरू झाला, पण तोवर आरोपींना जामीन मिळाला. पोलिसांच्या या दिरंगाईमुळे तसेच आर्थिक परिस्थितीमुळे घरावर आलेल्या जप्तीमुळे नैराश्यात गेलेले कोरडे यांनी ६ ऑक्टोबर रोजी क्लासरूममध्ये विष घेतले. तत्पूर्वी त्यांनी स्वतः ११२ वर पोलिसांना विष घेतल्याची माहिती दिली होती. उपचारादरम्यान बुधवार, ७ ऑक्टोबरला त्यांचा मृत्यू झाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *