Headlines

विरोधी पक्षनेतेपदावरून खा. भुमरे, संजय शिरसाट गटांत जुंपली:तुम्ही गावात आहात का? सभापतींनी व्हिडिओ कॉलवरून तपासले ग्रामसेवकाचे लोकेशन‎




पंचायत समितीची मासिक सभा पाणीटंचाई, चारा छावण्यांसारख्या गंभीर प्रश्नांवरून चांगलीच गाजली. सभेमध्ये उबाठाचे सदस्य दत्तात्रय वर्पे यांनी आम्हाला विरोधीपक्ष नेते पद आणि केबिन द्या अशी मागणी केली. यावर शिवसेना खासदार भुमरे गटाचे अनुराग शिंदे यांनी आमचे सदस्य जास्त असून आम्हाला विरोधी पक्षनेते पद आणि केबिन देण्याची मागणी केली. यावर सभापतीं गायकवाड यांनी तुम्ही आमच्यासोबत सत्तेत असल्याने तुम्हालाविरोधी पद कसे द्यायचे असा प्रश्न केला. त्यावर आम्ही पालकमंत्री गटाच्या उपसभापतींना मानत नाही असे सदस्य शिंदे यांनी म्हटल्याने उपसभापती बाळासाहेब गाढे यांनी आक्षेप घेतल्याने शिवसेनेच्याच दोन गटांमध्ये वाद पाहायला मिळाला. पंचायत समितीची मासिक सभा बुधवारी सभापती कल्याण गायकवाड यांच्या अध्यक्षतेत पार पडली. यावेळी गटविकास अधिकारी शिवाजी साळुंके यांच्यासह सर्व सदस्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सभेत सदस्य अनुराग शिंदे यांनी एमजीएम विद्यापीठाकडून तलावाचे अवैधरीत्या पाणी उपसले जात असल्याचा गंभीर आरोप केला. याची दखल घेत सभापती कल्याण गायकवाड यांनी ग्रामसेवकांनी सरकारी विहिरींवरील पाणी उपसा त्वरित थांबवावा, पाण्याच्या बाबतीत सतर्क राहावे आणि गाव पातळीवरील छोट्या-मोठ्या अडचणी तत्काळ सोडवाव्यात, असे आदेश त्यांनी दिले. दुष्काळी परिस्थिती पाहता सर्जेराव चव्हाण यांनी तालुक्यात चारा छावण्या सुरू करण्याचा आणि पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांचे लसीकरण करण्याचा ठराव मांडला. हा ठराव बहुमताने संमत करण्यात आला. पळशी शाळेतील मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या सदस्यांना माहिती न देताच तोडल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दणके यांनी सदस्यांना उद्घाटनाला बोलावणार असल्याचे सांगितले. सभापती गायकवाडांकडून भत्ता बंद करण्याचा आदेश शाळांमध्ये शिक्षक वेळेवर येत नाहीत, ग्रामसेवक गावात नसतात, असा आरोप सदस्य शेखर दांडगे यांनी केला. यावरून सभापतींनी चार विभाग प्रमुखांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. शहानिशा करण्यासाठी एका ग्रामसेवकाला थेट व्हिडिओ कॉल लावून खुलासा मागितला असता, तो ग्रामसेवक गावात हजर नसल्याचे समोर आले. यापूर्वी देखील २२ कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता कापण्यात आला आहे. यापुढे देखील कोणी अनुपस्थित राहत असेल तर भत्ता कापण्यात येईल असा इशारा दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *