Headlines

विजेचा धक्का लागून झीरो वायरमनचा मृत्यू:पिशोर ठाण्यात नोंद, भिलदरी शिवारातील घटना‎




महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत भिलदरी शिवारात वीजवाहिनीवरील तांत्रिक बिघाड दुरुस्त करताना अचानक विजेचा धक्का लागल्याने झिरो वायरमन म्हणून काम करणाऱ्या विलास कडुबा मोकासे (५०, रा. पिशोर, ता. कन्नड) यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. भिलदरी शिवारात वीजवाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तो दुरुस्त करण्यासाठी विलास मोकासे गेले होते. काम सुरू असतानाच त्यांना अचानक विद्युत प्रवाहाचा धक्का बसला. त्यांना तातडीने पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. पटेल यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी ग्रामीण रुग्णालयाच्या माहितीवरून पिशोर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद आहे. प्रभारी सहायक अभियंता कुलकर्णी म्हणाले, याबाबत चौकशी करण्यात येत असून, याची माहिती वरिष्ठांना दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *