Headlines

पदवी-नोंदणी पुरावा नाही, दवाखाना सुरू:बोगस डॉक्टराविरोधात ग्रामस्थांचा संताप, जायखेड्यात ग्रामसभेत कारवाईसाठी दबाव; कागदपत्रे सादर न केल्याचा आरोप‎



जायखेडा येथे शैक्षणिक पात्रता व शासकीय परवानगीची कागदपत्रे सादर न करताच दवाखाना सुरू केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी बोगस व अनधिकृत डॉक्टरांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अशा व्यक्तींकडून अॅलोपॅथी औषधे देणे, सलाईन लावणे व इंजेक्शन देण्यासारखे प्रकार

.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित डॉक्टरांनी दवाखाना सुरू करण्यासाठी जायखेडा ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. ग्रामपंचायतीने शैक्षणिक पात्रता (डिग्री) तसेच प्रशासकीय/शासकीय परवानगीची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. मात्र, ही कागदपत्रे सादर न करताच दवाखाना सुरू करण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे गावातील तरुण व ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी या प्रकरणाची सखोल तपासणी करून बोगस किंवा अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आता प्रशासनाकडून होणाऱ्या तपासणीत संबंधित डॉक्टरांची शैक्षणिक पात्रता, वैद्यकीय नोंदणी आणि आवश्यक परवानग्या वैध आहेत का, हे स्पष्ट होणार आहे. ग्रामस्थांनी तहसीलदार, पोलिस निरीक्षक, जायखेडा ग्रामपंचायत, तालुका वैद्यकीय अधिकारी व जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांना निवेदनाची प्रत सादर केली आहे. त्यामुळे आता प्रशासनाच्या कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

घटनेची गंभीर दखल घेतली आहे. स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांना संबंधित दवाखान्याची तत्काळ पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. पाहणी अहवाल व संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर नियमानुसार योग्य ती कठोर कारवाई केली जाईल. – डॉ. अमोल पाठक, तालुका वैद्यकीय अधिकारी, बागलाण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *