Headlines

ज्यांनी 'नटसम्राट' नाटक केले, ते सगळे हार्ट अटॅकनेच गेले…:नाना पाटेकरांनी व्यक्त केलेली 'ती' भीती अखेर खरी ठरली




आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज (८ ऑक्टोबर) गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ७५ व्या वर्षी अचानक आलेल्या या मृत्यूने संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. नानांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांच्या जुन्या मुलाखती आणि व्हिडिओ शेअर करून चाहते आठवणींना उजाळा देत आहेत. यातच त्यांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नानांनी चक्क स्वतःच्या मृत्यूची आणि ‘हार्ट अटॅक’ची भीती व्यक्त केली होती. नागपूरच्या कार्यक्रमातील ‘तो’ खुलासा काही महिन्यांपूर्वी नागपूरमध्ये जलक्रांती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासह जलसंवर्धनावर काम करणारे अनेक दिग्गज उपस्थित होते. याच मंचावरून बोलताना नाना पाटेकर यांनी ‘नटसम्राट’ या अजरामर कलाकृतीबद्दल आणि त्याच्या कलाकारांवर होणाऱ्या परिणामांबद्दल एक मोठा खुलासा केला होता. ‘२५ प्रयोगांनंतर मी मेलो असतो…’ ‘नटसम्राट’ची भूमिका रंगमंचावर न करण्यामागचे कारण सांगताना नाना म्हणाले होते, “ज्यावेळी मला ‘नटसम्राट’ नाटकासाठी विचारणा झाली, त्यावेळी मी स्पष्ट नकार दिला. मी त्यांना म्हटले की मी नाटक नाही, सिनेमा करेन. कारण, नाटक करताना प्रत्येक वेळी त्या भूमिकेत आपला जीव ओतावा लागतो. जर मी ते नाटक केले असते, तर मला वाटते १०, १५ किंवा २५ प्रयोगांनंतर मी नक्कीच मेलो असतो.” नटसम्राट आणि हार्ट अटॅकचे कनेक्शन या भूमिकेची तीव्रता किती भयानक असते, हे सांगताना नानांनी दिग्गज कलाकारांचे उदाहरण दिले होते. ते म्हणाले, “डॉ. लागू, दत्ता भट, चंद्रकांत गोखले, यशवंत दत्त… या सगळ्या दिग्गजांनी रंगमंचावर नटसम्राट उभा केला. या सर्वांनी भूमिकेत स्वतःला इतके ओतून दिले की, हे सगळेच जण हार्ट अटॅकने गेले. कारण त्या भूमिकेत स्वतःला पूर्णपणे ओतल्याशिवाय प्रेक्षकांना तो आनंद देताच येत नाही. याच भीतीपोटी नानांनी नाटकाऐवजी सिनेमाची निवड केली होती. विक्रम गोखलेंचे कौतुक आणि ‘नाम’चा आनंद याच कार्यक्रमात नानांनी दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांच्या अभिनयाचे तोंडभरून कौतुक केले होते. “विक्रम गोखले अभिनयाच्या बाबतीत माझ्यापेक्षा कैक पटीने सरस होते. त्यांनी गाठलेली अभिनयाची उंची गाठणे कोणालाही शक्य नाही,” अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली होती. तसेच, रंगमंचावरील अनुभवांबद्दल बोलताना त्यांनी ‘पुरुष’ नाटकाची आठवण सांगितली. “पुरुष नाटकाच्या मध्यांतरात पडदा पडल्यानंतर संपूर्ण नाट्यगृहात एका खुर्चीचाही आवाज यायचा नाही. प्रेक्षक अक्षरशः सुन्न व्हायचे. एक नट म्हणून प्रेक्षकांकडून मिळणारा तो अत्युच्च आनंद असतो. आणि नेमका हाच आनंद मला आज ‘नाम’ फाऊंडेशनचे सामाजिक काम करताना मिळतो,” अशी भावूक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती. ———– संबंधित बातम्या वाचा.. नाना पाटेकर यांचे वयाच्या 75व्या वर्षी निधन: 100 हून अधिक चित्रपट, 3 राष्ट्रीय, 4 फिल्मफेअर पुरस्कार; कारगिल युद्धादरम्यान सैन्यासोबत होते ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज सकाळी निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या गोव्यातील घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर सुमारे 45 मिनिटे सीपीआर (CPR) देण्यात आले, परंतु त्यांचा जीव वाचवता आला नाही. डॉ. शेखर साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांचे पहाटे 5वाजून 20 मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर वैद्यकीय-कायदेशीर खटला (MLC) दाखल करण्यात आला असून, शवविच्छेदन केले जाईल. सविस्तर वाचा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन:संवेदनशील, अष्टपैलू अन् करारी अभिनेता गमावला; नानांच्या निधनावर राजकीय नेत्यांकडून शोक व्यक्त भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू, दिग्गज आणि आपल्या सखोल अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज सकाळी निधन झाले आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी गोव्यातील आपल्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील घरी असताना त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली पण त्यांचा जीव वाचवता आला नाही. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वात आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *