![]()
संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची प्रवक्तेगिरी करणे बंद करावे. काल ज्या पद्धतीने दिल्लीतील रस्त्यावर राहुल गांधींनी गोंधळ घातला. राहुल गांधी, प्रियांका गांधींकडून महिला पोलिस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करतानाचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. राहुल गांधींच्या आंदोलनातून दिल्लीत अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, आंदोलनाच्या नावाखाली कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणं हेच काँग्रेसचं राजकारण आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, काल आसाममध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक झाली त्या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. त्याबद्दल राहुल गांधी चकार शब्द बोलत नाहीत. राहुल गांधी EVM वर बोलत होते पण त्यावर बोलता येत नाही म्हणून ते आता SIR वर बोलत आहेत. तुमच्या काळात SIR झाले तेव्हा ते योग्य होते का? 2002-2004 च्या काळात SIR झाले तेव्हा तुमची काय भूमिका होती. तुमच्या सरकारच्या काळात झालेल्या गोष्टी योग्य आणि भाजप सरकारच्या काळातील गोष्टी अयोग्य ही राहुल गांधींची भूमिका म्हणजे नौटंकी आहे. हुकुमशाहीबद्दल राऊतांनी बोलूच नये नवनाथ बन म्हणाले की, जनतेने विरोधकांना घरी बसवण्याचे काम केले आहे. राऊतांनी हुकुमशाहीच्या गप्पा मारू नये. काँग्रेसचे सरकार असताना देशात आणिबाणी लादत लोकांना कारागृहात डांबणाऱ्या राहुल गांधींच्या आजी होत्या.काँग्रेसच्या काळात जनसंघाच्या अनेक कार्यकर्त्यांना 2 दोन वर्षे कारागृहात रहावे लागले. उद्धव ठाकरेंचे सरकार असताना कार्टुन फॉरवर्ड केले म्हणून एका नौदल अधिकाऱ्याचा तुम्ही डोळा फोडला होता. तर विरोधात बातमी करणाऱ्या पत्रकाराला अटक करत तळोजा जेलमध्ये ठेवले होते. त्यामुळे हुकुमशाहीबद्दल काही बोलू नका. इंडिया आघाडीत समन्वय नाही नवनाथ बन म्हणाले की, इंडिया आघाडीमध्ये कोणत्याच पक्षाचा समन्वय दिसून येत नाही.राहुल गांधींना केवळ स्वत:चे नेतृत्च मोठे आहे हे सिद्ध करायचे आहे. त्यामुळे त्यांनी इंडिया आघाडीतील नेत्यांना आंदोलनासाठी बोलवले नाही. ते श्रेय घेण्यासाठी माध्यमांसमोर येत आहे. रोहित पवार यांना असे वाटते की मी एकटाच विद्यार्थ्यांसाठी लढतो आहे, चार हना पण नेता म्हणा अशी त्यांची अवस्था झाली आहे. रोज उठून त्यांच्याकडून नौटंकी सुरू आहे. बारामती ॲग्रोचे कार्यकर्ते जमा करत हे सर्व आंदोलन करत आहेत. विश्वजीत कदम, रोहित पवार हे उद्या मंत्री होतील पण विद्यार्थ्यांना त्यांचा काही फायदा नाही. विद्यार्थ्यांनी त्यांच्या नादी लागू नये, ही लोकं सर्व काही घराणेशाहीने देत असतात. रोहित पवारांनी पुणेकरांना त्रास होऊ देऊ नये नवनाथ बन म्हणाले, रोहित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर आंदोलन करत सामान्य पुणेकरांना त्रास दिला जात आहे. त्यांनी हे आंदोलन कुठल्यातरी मैदानात जाऊन केले पाहिजे. हायकोर्टाने सुद्धा तसे सांगितेल आहे. सामान्य पुणेकरांना आंदोलनाचा त्रास होणार नाही असे आंदोलन केले पाहिजे. महाराष्ट्राने संवेदनशील व्यक्तिमत्त्व गमावले नवनाथ बन म्हणाले की, नानांच्या जाण्याने कला क्षेत्रासोबत सामाजिक कार्याचीही मोठी हानी झाली आहे. तर नाना पाटेकरांच्या निधनाने महाराष्ट्राने संवेदनशील व्यक्तिमत्त्व गमावले आहे. नानांच्या चित्रपटाचा प्रभाव आपल्या सर्वांवर होता. त्यांच्याकडे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात होता. आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
Source link
राहुल गांधींकडून आंदोलनांच्या नावाखाली दिल्लीत अराजकता निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न:त्यांची नौटंकी जनता ओळखून, आसाममध्ये बॅलेट पेपरवरील निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ- बन