![]()
बेकायदा गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत आरोपीला सासवड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. आरोपीकडून पिस्तूल, मॅगझीन आणि दुचाकी असा एकूण ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सासवड येथील सैनिक कॅन्टीनच्या पाठीमागील परिसरात करण्यात आली. रोहित राजू माने (वय २४, रा. गुजरवाडी, दत्तनगर, निंबाळकरवस्ती, कात्रज, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे आणि गुन्हे शोध पथक हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय बातमीदाराकडून संशयिताबाबत माहिती मिळाली. काळ्या रंगाच्या स्प्लेंडर दुचाकीसह एक व्यक्ती रस्त्याच्या बाजूला बसल्याचे बातमीदाराने सांगितले. माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक शंकर राऊत आणि पथक घटनास्थळी पोहोचले. तेथे दुचाकीवर बसलेल्या व्यक्तीकडे चौकशी करण्यात आली. सुरुवातीला त्याने नाव आणि पत्ता सांगण्यास टाळाटाळ केली. संशय बळावल्याने अधिक चौकशी केली असता त्याने आपली ओळख सांगितली. तसेच दुचाकीच्या टूलबॉक्समध्ये पिस्तूल असल्याची माहिती दिली. पोलिसांनी दोन पंचांना घटनास्थळी बोलावून त्यांच्यासमक्ष दुचाकीचा टूलबॉक्स उघडला. त्यामध्ये स्टीलचे गावठी पिस्तूल आढळले. पंचांसमक्ष ते जप्त करून आरोपीला दुचाकीसह पोलीस ठाण्यात आणण्यात आले. जप्त मुद्देमालात ५० हजार रुपये किमतीचे पिस्तूल, एक हजार रुपये किमतीचे मॅगझीन आणि ४५ हजार रुपये किमतीच्या दुचाकीचा समावेश आहे. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनूसार, आरोपीविरुद्ध यापूर्वी लोणीकंद, कोंढवा, खडक आणि वाघोली पोलीस ठाण्यांत विविध गुन्ह्यांची नोंद आहे. या नोंदींमध्ये चोरी, घरफोडी आणि शस्त्रविषयक गुन्ह्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर आणि पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. सहायक पोलीस निरीक्षक शंकर राऊत यांच्या पथकातील परमेश्वर गोसावे, दत्तात्रय काळे, जाधव, गोकुळ हिप्परकर, तुषार लोंढे आणि प्रवीण शेंडे यांनी कारवाईत सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शंकर राऊत करीत आहेत.
Source link
सासवडमध्ये गावठी पिस्तुलासह सराईत आरोपीला अटक:96 हजार किमतीचे पिस्तूल, मॅगझीन आणि दुचाकी जप्त; आरोपीवर अनेक गुन्हे दाखल