Headlines

पुण्यात चोरांचा सुळसुळाट:एसटी बसमध्ये प्रवासी महिलेचे दागिने लंपास, अक्कलकोट-स्वारगेट मार्गावर घडली घटना




एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून तीन लाख 90 हजार रुपयांची दागिने चोरट्याने लांबविल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 47 वर्षीय महिला सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णीच्या रहिवासी आहेत. त्या टेंभुणीहून एसटी बसने पुण्याकडे निघाल्या होत्या. अक्कलकोट ते स्वारगेट स्थानक या मार्गावरील बसमधून त्या प्रवास करत होत्या. प्रवासात चोरट्याने त्यांच्याकडील पिशवीतून दागिने चोरुन नेले. स्वारगेट एसटी स्थानकात महिला बसमधून उतरल्या. तेव्हा पिशवीतून दागिने चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिस हवालदार एस राऊत तपास करत आहेत. पीएमपी प्रवासी महिलेची बांगडी चोरीला पीएमपी प्रवासी महिलेची 70 हजार रुपयांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी चोरल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 48 वर्षीय महिला वडगाव शेरीतील सोमनाथनगर परिसरात राहायला आहेत. त्या महापालिका भवन परिसरातील थांब्यावरुन वडगाव शेरीकडे जाणाऱ्या पीएमपी बसमधून प्रवास करत होत्या. बसमध्ये प्रवेश करताना गर्दीत महिलेच्या हातातील 70 हजार रुपयांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी चोरली. सहायक पोलिस निरीक्षक एन पालमपल्ली तपास करत आहेत. पुणे स्टेशन परिसरात विश्वासाने दिलेले सोन्याचे दागिने घेऊन पोबारा ओळखीचा फायदा घेऊन विश्वासाने ताब्यात घेतलेली सोन्याची अंगठी आणि सोन्याचे गंठण असा ऐवज परत न करता अपहार केल्याची घटना घडली. याप्रकरणी प्रशांत गोपाळ पिठले (वय 30, रा. वाईगाव, ता. उदगीर, जि. लातूर) याच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आम्रपाली संग्राम वाघमारे (वय 38, रा. कुमठा बुद्रुक, ता. अहमदपूर, जि. लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना तुकाराम शेठ शिंदे वाहन तळाच्या मागे व रेल्वे स्टेशन पार्सल गेटसमोर घडली. आरोपीने फिर्यादीकडून विश्वासाने एक तोळा वजनाची सोन्याची अंगठी व एक तोळ्याचे सोन्याचे गंठण घेतले. मात्र, ते दागिने स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फिर्यादीचा विश्वासघात करत परत दिले नाहीत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एन चव्हाण करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *