![]()
सांभाळण्यासाठी दिलेले श्वान परत न देता साडेतीन लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी प्राण्यांच्या सांभाळ करणाऱ्या एका संस्थेच्या चालक महिलेसह दोघींविरुद्ध लोहगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.या प्रकरणी पॉस फॉर लाईफ फाऊंडेशनच्या संचालक देवयानी उर्फ श्रृती लोणे, विश्वस्त शेला नाईक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने लोहगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 39 वर्षीय लोहगावमधील मोझेनगर भागात राहायला आहे. मोझेनगर भागात त्यांचा बंगला आहे. प्राण्यांचा सांभाळ करणाऱ्या संस्थेचे कार्यालय लोणी काळभोर परिसरातील म्हातोबाची आळंदी येथे आहे. जानेवारी महिन्यात तक्रारदार महिलेने संबंधित संस्थेला सात श्वान तात्पुरत्या स्वरुपात सांभाळ करण्यासाठी दिले होते. महिलेने संबंधित संस्थेच्या चालकांकडे महिलांकडे श्वान परत करण्याची मागणी नुकतीच केली. तेव्हा संबधित संस्थेतील चालक महिलांकडून तक्रारदार महिलांकडे साडेतीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली. तक्रारादार महिलेला शिवीगाळ करुन धमकाविण्यात आले, असे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक एन खांडेकर तपास करत आहेत. उद्यानाच्या आवारात मंदिरातील दानपेटी फोडली घोरपडे पेठेतील घोरपडे उद्यानाच्या आवारात असलेल्या एका मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी साडेपाच हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध खडक पोलिसंनी गुन्हा दाखल केला. याबाबत अरुण बजरंग जाधव (वय 35, रा. कैकाड आळी, घोरपडे पेठ) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडे पेठेतील पुणे महापालिकेचे श्रीमंत भैरवसिंह घोरपडे उद्यान आहे. उद्यानाच्या आवारात श्री शिव मंदिर आहे. चोरट्यांनी मंदिराच्या आवारातील दानपेटीचे कुलूप तोडले. दानपेटीतील साडेपाच हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसंनी उद्यानाच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलिस हवालदार हेमंत पेरणे तपास करत आहेत.
Source link
पाळीव श्वान परत न देता साडेतीन लाखांची खंडणी:संस्थेच्या संचालकांसह दोघींविरुद्ध लोहगाव पोलिसांकडून गुन्हा दाखल