Headlines

Shivendra Raje Bhosale Slams MPSC Protest Politics; Targets Opposition


“पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससीच्या (MPSC) आंदोलनात सध्या दोन परस्परविरोधी अजेंडे कार्यरत आहेत. एकीकडे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त आणि न्याय्य आहेत; तर दुसरीकडे राजकीय अस्तित्वासाठी धडपडणारे नेते या निष्पाप विद्यार्थ्यांच

.

आंदोलन विद्यार्थ्यांचे, पण चर्चा विरोधकांच्या राजकीय अस्तित्वाची!

आंदोलनस्थळी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या वाढत्या वावरावर बोट ठेवत शिवेंद्रराजे म्हणाले, “दररोज विरोधी पक्षातील नेते तिथे हजेरी लावत आहेत आणि मोठी भाषणे ठोकत आहेत. मात्र, त्यांच्या भाषणांत विद्यार्थ्यांच्या अडचणींऐवजी केवळ सत्ताधाऱ्यांवर वैयक्तिक टीका आणि राजकीय शेरेबाजीच ऐकायला मिळते. याचाच अर्थ असा की, तिथे येणाऱ्या या पुढारी मंडळींना विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी काहीही देणेघेणे उरलेले नाही; त्यांना केवळ आपल्या राजकीय पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत.”

कॅमेऱ्याच्या झोतात राहण्याचा केविलवाणा प्रयत्न

“पुण्यातील या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे आणि प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले गेले आहे. याचा गैरफायदा घेत माध्यमांचे फुटेज मिळवण्यासाठी आणि स्वतःला जनतेसमोर फ्लॅश करण्यासाठी विरोधी पक्षांचे नेते तिथे गर्दी करत आहेत.”

अजितदादांची जागा घेण्याची घाई अन् डबघाईला गेलेल्या पक्षांचे रीलॉन्चिंग!

विरोधी पक्षांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेची चिरफाड करताना त्यांनी सांगितले, “अजितदादा अचानक गेल्यामुळे पुण्यात जी मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे, ती जागा पटकावण्यासाठी काही मंडळी आक्रमक झाली आहेत. कोणाचा पक्ष पूर्णपणे डबघाईला आला आहे, तर त्यांना याच आंदोलनाच्या माध्यमातून आपले रीलॉन्चिंग करायचे आहे.”

सत्तेची स्वप्ने चक्काचूर झाल्याचे वैफल्य

“लोकसभेनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांना वाटले होते की राज्यात आता त्यांचेच सरकार येणार. अगदी कोणती खाती घ्यायची आणि कोणते शासकीय बंगले ताब्यात घ्यायचे, याचे वाटपही त्यांनी कागदावर करून ठेवले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या अचूक नियोजनापुढे आणि भाजपच्या संघटनशक्तीपुढे या सर्वांचे सत्तेचे पत्ते चारीमुंड्या चीत झाले. त्या वैफल्यातून बाहेर पडण्यासाठी आता स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचा वापर सुरू आहे.”

घर बांधून देण्याच्या बाता आणि बोकडाच्या मटनाची आमिषे; ही काँग्रेसची जुनीच विकृती

आंदोलनाच्या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या आश्वासनांवर टीका करताना आमदार भोसले म्हणाले, “कोणीतरी तिथे जाऊन ‘मी तुम्हाला घरे बांधून देतो’ अशा वल्गना करत आहे, तर आज सकाळीच सोशल मीडियावर पाहिले की आंदोलन दोन-तीन दिवसांत यशस्वी झाले तर ‘सगळ्यांना बोकडाचे मटन देणार’ अशी जाहीर विधाने केली जात आहेत. हे प्रकार अत्यंत हास्यास्पद आणि निंदनीय आहेत. लोकांना अशा प्रलोभनांच्या दावणीला बांधून ठेवणे ही जुनी काँग्रेस संस्कृती असून, आज तीच संस्कृती या आंदोलनात आणली जात आहे.”

विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याचा विचार करावा; फडणवीस सकारात्मक निर्णय घेतील

आंदोलक विद्यार्थ्यांना समजूतदारपणाची साद घालत शिवेंद्रराजे म्हणाले, “एमपीएससीच्या प्रामाणिक मुलांच्या मागण्या अत्यंत रास्त आहेत. परीक्षांचे नियोजन वेळेत व्हावे, पेपरफुटी कायमची थांबावी आणि पारदर्शक भरती व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. बैठकीत त्यांनी विद्यार्थ्यांना ठोस शब्द दिला असून, भविष्यातील परीक्षांसाठी कठोर एसओपी (SOP) आणि नियमावली तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे.”

वाटाघाटीनेच सुटेल प्रश्न

“रस्त्यावर बसून आणि राजकीय नेत्यांच्या नादी लागून विद्यार्थ्यांचे आयुष्य सुरक्षित होणार नाही. प्रश्न सुटणार असतील तर ते केवळ सरकारशी थेट चर्चा करूनच सुटतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी राजकारण्यांच्या अजेंड्याला बळी न पडता, स्वतःच्या करिअरचा आणि भविष्याचा गांभीर्याने विचार करून आपले आंदोलन मागे घ्यावे आणि मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून हा तिढा सन्मानाने सोडवावा,” असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

———————————————————-

हेही वाचा…

मित्रासाठी विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ; गेंड्याच्या कातडीचे सरकार:MPSCचे शुद्धीकरण झाल्याशिवाय 70 हजार पदभरती म्हणजे चोरांचेच खिसे भरणे! -रोहित पवार

“एमपीएससीमधील (MPSC) दलालांचे आणि अधिकाऱ्यांचे अंतर्गत रॅकेट जोपर्यंत उद्ध्वस्त केले जात नाही, तोपर्यंत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या राज्यातील लाखो गरीब विद्यार्थ्यांचा या व्यवस्थेवर विश्वास बसणार नाही. एमपीएससीचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास मित्र असल्यानेच सरकार लाखो तरुणांच्या भविष्याशी खेळून आपल्या लाडक्या मित्राला वाचवण्याचा हट्ट करत आहे. हे सरकार अत्यंत निर्दयी आणि गेंड्याच्या कातडीचे आहे. परीक्षा पद्धतीत पारदर्शकता न आणता आणि अध्यक्षांचा राजीनामा न घेता तुम्ही 70 हजार पदांची भरती करा अथवा 2 लाख पदांची; यात चोरांचे आणि भ्रष्टाचाऱ्यांचेच खिसे भरतील, गरीब शेतकऱ्यांच्या मुलांचे मरण मात्र टळणार नाही,” असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.