![]()
राज्यातील विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीकडून बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते. राज्यातील पाचपैकी दोन जागा शिक्षक मतदारसंघातील, तर तीन जागा पदवीधर मतदारसंघातील आहेत. पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघांतील उमेदवारीचे अंतिम चित्र आज स्पष्ट झाले. पुण्यात महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने माघार घेतली, तर अमरावतीतही तीन बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघातून पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज चव्हाण, रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रीती रेवने आणि आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार सामाजिक संघटनेचे नितीन आगे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. याशिवाय अपक्ष उमेदवार सजील खान यांनीही निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार किरण सरनाईक यांची उमेदवारी अंतिम झाली आहे. या घडामोडींमुळे महायुतीतील उमेदवारांमधील संभाव्य मतविभाजन टळण्यास मदत होणार आहे. दरम्यान, अमरावती शिक्षक मतदारसंघात काँग्रेसकडून अदिती ऋषिकेश पोहरे, तर शिवसेना ठाकरे गटाकडून दत्तात्रय लहाने निवडणुकीच्या रिंगणात आहेत. किरण सरनाईक, अदिती पोहरे आणि दत्तात्रय लहाने यांच्यात प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर अमरावती शिक्षक मतदारसंघात एकूण 26 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीमधील बंडखोर उमेदवार: 1) संगीता सचिंद्र शिंदे-बोंडे (भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी)
2) शेखर भोयर (भाजप, आमदार राजेश वानखडे यांचे मेहुणे.)
3) श्रीकांत देशपांडे माजी आमदार तथा शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी
4) सुमित पवार, भाजपा पदाधिकारी या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. पुणे शिक्षक मतदारसंघातून चिवटेंची माघार:भाजपचे कौस्तुभ गावडेच महायुतीचे उमेदवार, पदवीधर मतदारसंघातही बंडखोरी शमली राज्यात विधानपरिषद (पदवीधर आणि शिक्षक) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये निर्माण झालेला बंडखोरीचा तिढा अखेर मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने सुटला आहे. पुणे आणि मराठवाडा मतदारसंघात परस्परांविरोधात उभे राहिलेले महायुतीचे बंडखोर आणि घटक पक्षांचे उमेदवार यांनी अर्ज मागे घेतल्याने आता महायुतीच्या अधिकृत उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे. वाचा सविस्तर
Source link
अमरावतीत महायुतीला दिलासा!:तीन बंडखोरांची माघार; अमरावती शिक्षक मतदारसंघात 26 उमेदवार रिंगणात