Headlines

विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणुकीचे चित्र स्पष्ट:उमेदवारी अर्ज माघारीनंतर राजकीय समीकरणे बदलली; कुठे कोणात रंगणार लढत?




विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होणार असून, यामध्ये पुणे शिक्षक, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर या मतदारसंघांचा समावेश आहे. दरम्यान, या पाचही मतदारसंघांसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे उमेदवारांच्या माघारीनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. आता पाहुयात कोणत्या मतदारसंघात कोणाला संधी देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार सतीश चव्हाण आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप घुगे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रतापसिंह पाटील हे देखील निवडणुकीच्या रिंगणात असल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या हर्षदा देशमुख यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. दरम्यान, माजी आमदार दत्ता सावंत यांनीही आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीसमोर आव्हान पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आणि काँग्रेसचे जयंत आसगावकर यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. मात्र, सचिन सानप यांनीही आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने निवडणुकीतील चुरस वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या मतविभाजनाची शक्यता निर्माण झाली असून, या मतदारसंघातील निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात बंडखोरीचे आव्हान अमरावती शिक्षक मतदारसंघात काँग्रेसच्या अदिती पोहरे आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण सरनाईक यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. तर शिवसेना ठाकरे गटाकडून दत्तात्रय लहाने निवडणूक लढवत असल्याने येथे तिरंगी लढतीचे चित्र आहे. दरम्यान, या मतदारसंघात बंडखोरीही पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटामधील माजी आमदार श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. तसेच भाजप आमदार राजेश वानखडे यांचे मेहुणे शेखर भोयर यांनीही बंडखोरी करत निवडणुकीतून माघार घेतलेली नाही. नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपसमोर बंडखोरीचे आव्हान नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. मात्र, भाजपचे माजी आमदार अनिल सोले यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नितेश कराळे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील लढतीकडे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *