![]()
एल निनोच्या प्रभावामुळे यंदा महाराष्ट्रात १९ टक्के पाऊस कमी झाला म्हणून सरकारने २६५ तालुक्यांमध्ये सप्टेंबर अखेर दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुष्काळी भागांतील उपाययोजनांसाठी स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक २९ सप्टेंबर रोजी झाली होती. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीतील चर्चेनंतर आणखी १८ तालुक्यांत प्रत्यक्ष पाहणीनंतर दुष्काळ जाहीर केला जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला आहे. प्रमुख ५ पिकांचे २० टक्के सर्वेक्षण होणार : शासनाने दिलेल्या आदेशानुसार, ट्रिगर-१ यादीतील तालुक्यांव्यतिरिक्त परिशिष्ट-अ मध्ये समाविष्ट केलेल्या १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता व परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे या तालुक्यांमधील प्रमुख ५ पिकांचे २० टक्के सर्वेक्षण आणि ‘ग्राउंड ट्रथिंग’ केले जाईल, ज्यामुळे तेथील खरीप पिकांच्या नुकसानीचा अचूक अंदाज बांधता येईल, असे सूत्रांनी सांगितले. दुष्काळी मदत अर्जासाठी १५०० ची लाच घेणाऱ्या वनरक्षकाला अटक शिरपूर | दुष्काळी मदत अर्जाकरिता वन हक्काचे फॉर्म देण्यासाठी १५ शेतकऱ्यांकडून प्रत्येकी १०० रुपयांप्रमाणे १,५०० रुपयांची लाच घेताना सांगवी वन परिक्षेत्र कार्यालयातील वनरक्षक राहुल रामदास बहिरम (३०, रा. धवळीविहीर, ता. साक्री) याला अटक करण्यात आली. शिरपूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाल्यानंतर दुष्काळी मदतीसाठी आवश्यक वन हक्काचे दस्तऐवज मिळवण्याकरिता तक्रारदाराने वडिलांसह वकवाड गावातील अन्य १४ शेतकऱ्यांचे अर्ज सांगवी वन परिक्षेत्र कार्यालयात दिले होते. ‘ग्राउंड ट्रथिंग’ म्हणजे नेमके काय असते? उपग्रह, ड्रोन किंवा रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाद्वारे मिळवलेल्या माहितीची प्रत्यक्ष जमिनीवर (स्थळ पाहणी करून) जाऊन शहानिशा करणे म्हणजे ग्राउंड ट्रथिंग होय. तंत्रज्ञानाचा डेटा आणि प्रत्यक्ष जमिनीवरील वास्तव परिस्थिती यांची तुलना करून माहितीची अचूकता तपासण्याची ही एक पद्धत आहे. यामध्ये प्रमुख ५ पिकांचे २०% सर्वेक्षण करून वास्तव तपासले जाईल. पाहणी केले जाणारे एकूण १८ तालुके असे छत्रपती संभाजीनगर विभाग (२ तालुके): नांदेड: मुदखेड, मुखेड नागपूर विभाग (१० तालुके): चंद्रपूर: जिवती, ब्रह्मपुरी, बल्लारपूर गोंदिया: आमगाव, देवरी, सालेकसा, गोंदिया वर्धा: कारंजा भंडारा: मोहाडी, तुमसर नाशिक विभाग (३ तालुके): नाशिक: त्र्यंबकेश्वर, चांदवड, निफाड पुणे विभाग (३ तालुके): सातारा: पाटण सांगली: शिराळा, वाळवा.
Source link
राज्यात आणखी 18 तालुक्यांत प्रत्यक्ष पाहणीनंतर दुष्काळ जाहीर केला जाणार:मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय, पाणी-चाऱ्यासह इतर बाबींत सवलती मिळतील