![]()
धावपळीच्या जीवनशैलीत प्रत्येकाच्याआयुष्यात मानसिक ताण वाढताना दिसतआहे. मात्र, प्रत्येकाच्याया ताणामागील कारणेवेगवेगळी आहेत.विद्यार्थ्यांना भविष्याचीचिंता, गृहिणींनाघरातील वाढत्याजबाबदाऱ्या, तरशेतकऱ्यांना उत्पन्नाच्याचिंतेचा सामना करावा लागत आहे. मानसिकताणाच्या तक्रारी घेऊन येणाऱ्यांमध्ये १८ ते ३५वयोगटातील रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असून,दररोज विश्वासू व्यक्तीशी ५ मिनिटे संवादसाधावा, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशिषमोहिते यांनी स्पष्ट केले. आज जागतिक मानसिक आरोग्य दिनअसून त्याअनुषंगाने डाॅ. मोहिते यांनी मानसिकआरोग्य सुदृढ कसे ठेवता येईल यावर उपायसुचवले. अति ताण, कौटुंबिक समस्या,नातेसंबंधांतील अडचणी, सतत विचार करतराहणे आणि व्यसनाधीनता ही मानसिकआरोग्याशी संबंधित तक्रारींची मुख्य कारणेआहेत. मानसिक ताणाचा थेट परिणाम झोप,एकाग्रता, काम आणि वैयक्तिक संबंधांवरहोतो. सतत विचार करणे, निराशा वाटणे,झोपेच्या सवयींमध्ये बदल होणे व कामात मनन लागणे ही लक्षणे दीर्घकाळ राहिल्यास दुर्लक्षकरू नये. मोबाइल आणि सोशल मीडियाचाअति वापर केवळ तरुणांपुरता मर्यादित नसूनज्येष्ठ नागरिकांमध्येही मोठ्या प्रमाणावर दिसूनयेत आहे. त्यामुळे स्क्रीनचा वापर मर्यादितठेवून वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यकअसल्याचेही त्यांनी सांगितले. रात्री झोपण्यापूर्वी मोबाइलपासून दूर राहा दररोज शारीरिक हालचालींसाठी वेळ काढा, विशेषतःरात्री झोपण्यापूर्वी मोबाइलपासून दूर राहा, विश्वासूव्यक्तीशी संवाद साधा किंवा तज्ज्ञांची मदत घ्या,नियमित आणि पौष्टिक अन्नाचे सेवन करा,नकारात्मक विचारात अडकण्याऐवजी विचारांना योग्यदिशा देणे गरजेचे आहे.
चिंता वाटणे, अस्वस्थता, चिडचिड होते सतत चिंता वाटणे, अस्वस्थता, भूक किंवा झोपेचेप्रमाण बदलणे, एकाग्रता कमी होणे व चिडचिड वाढणेया लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. सध्या धावपळीच्याकाळात अतिताण, कौटुंबिक समस्या, नातेसंबंधांतीलअडचणी, सतत विचार करत राहणे आणिव्यसनाधीनता ही मानसिक आरोग्याशी संबंधिततक्रारींची मुख्य कारणे आहेत. एक्स्पर्ट व्ह्यू: डाॅ. आशिष मोहिते,मानसोपचारतज्ज्ञ
वैद्यकीय उपचार गरजेचे प्रत्येकाची ताण हाताळण्याचीक्षमता वेगळी असते. ताणाचाअंदाज घेण्यासाठी होम्स आणि राहेस्ट्रेस स्केल यांसारख्या साधनांचावापर केला जातो. जीवनशैलीतीलबदल पुरेसे नसून ताणाचा परिणामदैनंदिन आयुष्यावर होत असल्यासवेळेवर वैद्यकीय उपचार घेणेगरजेचे आहे. स्क्रीनिंग टाइम कमीकरणे प्रत्येकाच्या हातात आहे.
Source link
मानसिक आरोग्य दिन:तणावमुक्त जीवनासाठी दररोज 5 मिनिटे बोला, बदलत्या जीवनशैलीने 18 ते 35 वयोगटात मानसिक ताण वाढला