![]()
गाढेजळगाव शिवारात शेतात बेकायदेशीरपणे गांजाची लागवड केल्याचा प्रकार समोर आला आहे. करमाड पोलिसांनी शुक्रवारी सकाळी शेतात छापा टाकून ७२.७८ किलो वजनाची गांजाची झाडे जप्त केली. जप्त केलेल्या या गांजाची बाजारभावाप्रमाणे किंमत १८ लाख १९ हजार ५०० रुपये आहे. याप्रकरणी शेतकरी श्रीराम रघुनाथ कोरडे (५०, रा. गाढेजळगाव) याला अटक करण्यात आली आहे. गाढेजळगाव शिवारातील शेतात गांजाची लागवड केल्याची बातमी करमाड पोलिसांना मिळाली होती. खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी धाड टाकली. ही कारवाई पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळ ठाकूर, अंमलदार शिवाजी मदेवाड, संतोष चव्हाण, रमेश खंडागळे, शकुन बनकर यांच्या पथकाने केली. कनेक्शन उघड होणार एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड करण्यामागे आरोपीसोबत आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच जप्त केलेला गांजा कोणाला विकण्याचे नियोजन होते, याबाबत पोलिस तपास करत आहेत. कपाशीच्या शेतातच गांजा जप्त करण्यात आला असून, शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
Source link
गाढेजळगाव शिवारामध्ये कपाशीत गांजाची लागवड:करमाड पोलिस; 18 लाखांचा मुद्देमाल जप्त