![]()
डोंगरगाव फाट्याजवळ अज्ञात कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या १९ वर्षीय तरुणाचा बुधवारी रात्री १०.२० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. युवराज बस्तीराम इवने (वय १९, रा. भडूस, ता. जि. बैतूल, मध्य प्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे. युवराज सिल्लोड येथील एका जिनिंगमध्ये मजुरीचे काम करत होता. ३ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास जळगाव-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील डोंगरगाव फाट्यावरील हॉटेल गारवासमोर अज्ञात कारने त्याच्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात युवराजसह त्याच्यासोबत असलेला रोहित युवणे हा गंभीर जखमी झाला. दोघांना प्रथम सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात व प्रकृती गंभीर असल्याने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील सीआयसीयूमध्ये उपचार सुरू असताना युवराजचा मृत्यू झाला. रोहित युवणे याची प्रकृती सुधारत आहे. गुरुवारी सकाळी मूळ गावी भडूस येथे युवराजच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. त्याच्या पश्चात आई-वडील व एक भाऊ आहे.
Source link
कारच्या धडकेमध्ये जखमी मध्य प्रदेशच्या तरुणाचा मृत्यू:डोंगरगाव फाट्याजवळ अज्ञात भरधाव कारची धडक