Headlines

वणीच्या जगदंबा मातेच्या दर्शनासाठी आठ लाख भाविक येण्याचा अंदाज:उद्यापासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ; तिथीवाढीने यंदा दहा दिवस उत्सव




येथील जगदंबा माता शारदीय नवरात्रोत्सवासाठी मंदिर परिसर सज्ज झाला असून, यंदा सुमारे साडेसात ते आठ लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज जगदंबा ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने व्यक्त केला आहे. ११ ऑक्टोबरपासून सुरू होणारा नवरात्रोत्सव तिथीवाढीमुळे यंदा नऊऐवजी दहा दिवसांचा असणार आहे. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन सुरक्षा, स्वच्छता, आरोग्य, पिण्याचे पाणी आणि अन्य सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या प्रवेशद्वारापासून विद्युत रोषणाई करण्यात आली असून, सभामंडपाची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मंदिर परिसर आणि लगतचा तलाव स्वच्छ करण्यात आला आहे. ट्रस्ट व ग्रामपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून परिसर स्वच्छ ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महिला भाविकांसाठी स्वतंत्र वॉटरप्रूफ सभामंडप व्यवस्था दरवर्षी जगदंबा देवी मंदिरासमोर सुमारे दीड हजार महिला नऊ दिवस घटी बसतात. यंदा सुमारे एक हजार महिला घटी बसण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी वॉटरप्रूफ सभामंडप उभारण्यात आला असून, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी पुरेशा स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्याचे नियोजन ग्रामपंचायतीकडून करण्यात येणार आहे. ३६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून देखरेख भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर, सभामंडप आणि मंदिराच्या मागील परिसरात ३६ छुपे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नयेत आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी वणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. मंदिर परिसरासह गावातील सार्वजनिक उत्सव मंडळे, बसस्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गर्दी व्यवस्थापनाचे आव्हान यंदा आठ लाखांपर्यंत भाविक येण्याचा अंदाज असल्याने मंदिर परिसरातील गर्दीचे नियोजन, स्वच्छतागृहांची उपलब्धता, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि वाहतुकीचे व्यवस्थापन महत्त्वाचे ठरणार आहे. पोलिस, गृहरक्षक दल, ग्रामपंचायत आणि जगदंबा ट्रस्ट यांच्यातील समन्वयातून उत्सव निर्विघ्न पार पाडण्याचे आव्हान असेल. भाविकांची संख्या वाढल्यास उपलब्ध सुविधांवर ताण येऊ नये, यासाठी प्रशासनाला प्रत्यक्ष परिस्थितीनुसार उपाययोजना कराव्या लागतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *