Headlines

जायखेड्यात अंत्यविधीसाठी शवपेटी उपलब्ध करून द्या:महात्मा फुले जयंती उत्सव समितीची मागणी‎




जायखेडा येथील सर्वधर्मीयांच्या सुविधेसाठी ग्रामपंचायतीद्वारे कायमस्वरूपी शवपेटी उपलब्ध करून द्यावी, या मागणीचे निवेदन महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीतर्फे जायखेडा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रवीण सावंत यांना देण्यात आले. जायखेडा गावातील एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यास अंतिम संस्कार व अंत्येष्टीच्या प्रक्रियेदरम्यान नातेवाईक व ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः मृतदेह काही काळ सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असलेली शवपेटी उपलब्ध करताना आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांची मोठी पंचाईत होते. या समस्येची दखल घेत महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती, जायखेडा यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *