Headlines

लोकशाहीच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक:संदीप देशपांडे म्हणाले- राज्यभर सह्यांची मोहीम, पुढील आठवड्यात जनता रस्त्यावर उतरणार




सध्या देशभरात विविध मुद्द्यांवरून आंदोलनांचे सत्र सुरू असून, काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी सातत्याने SIR प्रक्रियेविरोधात आवाज उठवत असून, त्यांना पोलिसांनी अटकही केली आहे. दरम्यान, आज कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनाची हाक दिली होती; मात्र, पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांना विमानातच पोलिसांनी ताब्यात घेतले. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, सोमवारी जागोजागी सह्यांची मोहीम करतोय. पुढचा आठवडा महाराष्ट्राची जनता रस्त्यावर आलेली दिसेलच. त्यासाठी आम्हाला जेल मध्ये टाका वाटेल ते करा. आज जर आवाज उठवला नाही तर पुढची पिढी विचारेल कि लोकशाहीचा गळा घोटण्यात येत होता, तेव्हा तुम्ही कुठे होतात? संदीप देशपांडे म्हणाले, मुंबईत नाही तर महाराष्ट्रभर मोहीम असणार आहे. आमच्या एकट्या पक्षाचे नाही तर लोकशाही वाचवण्याच्या आंदोलनात सहभागी व्हा. करू द्या डिटेन, किती दिवस करायचे आहे. तुम्हाला जे करायचं ते करा. आम्हाला जे करायचं ते आम्ही करू. अभिजीत दिपके याने काय केलं, मर्डर, रेप, काय केलं? किती दिवस ठेवणार? उद्या दाबलात, परवा आवाज करू, किती दिवस आवाज डांबण्यात येईल? आम्हाला रोज पोलिस दिसतात, आम्ही पण पोलिसांना बघतो. नितीन सरदेसाई काय म्हणाले? यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी देखील प्रतिक्रिया देत म्हटले की, गेले काही दिवस आपण पाहतोय एसआयआर घोळ झाला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी हे केलं आहे. सत्ताधारी पक्षाला मदत व्हावी यासाठी केलं आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की असे कोणतेही आदेश दिले नव्हते. भारतात सर्वांच्या मनात चीड आहे पुढे बोलताना नितीन सरदेसाई म्हणाले, भारतात सर्वांच्या मनात चीड आहे याबद्दल. गर्जना मोर्चा मध्ये चीड लोकांची दिसून आली. आता ही दिल्लीत दडपशाही सुरु आहे. विचित्र प्रकारे आंदोलन दडपणचे प्रयत्न आहेत. गर्जना मोर्चा काढल्यावर आम्ही थांबलो नाही. सोमवारी सकाळी सर्व ठिकाणी सह्यांची मोहीम राबवणार आहोत. सर्व सामान्य नागरिकांनी येऊन सह्या कराव्यात पाहिला टप्पा असेल. त्यानंतर दसऱ्या पर्यंत काय काय करू हे कळेल तुम्हाला. अशी दडपशाही बघितली नाही सर्वसामान्यांच्या अधिकाऱ्यांवर गदा आणली जात आहे. लोकांच्या मनातील खदखद, चीड पुढे येण्यासाठी सोमवारपासून आमचं आंदोलन सुरु होईल. दिल्लीत ट्रेन बंद आहे. सर्वांनाच जाणवतंय यापूर्वी कोणीच अशी दडपशाही बघितली नाही. तुम्ही निवडणूक आयोगाबद्दल काही बोलायचं नाही असं सुरु आहे, अशी टीका नितीन सरदेसाई यांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *