![]()
सन मराठीवरील ‘मी संसार माझा रेखिते’ या मालिकेत नवरात्रोत्सवानिमित्त एक विशेष महाट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत पिहूच्या बॅडमिंटन कोचकडून तिच्याशी गैरवर्तन होत असल्याचे लक्षात येताच तिची आई अनुप्रिया तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. आपल्या लेकीच्या संरक्षणासाठी एक आई दुर्गेचे रूप धारण करून अन्यायाविरुद्ध कसा लढा देते आणि कोचला धडा शिकवते, हे या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. यानंतर अनुप्रियासमोर कोणती नवी आव्हाने उभी ठाकणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून या प्रोमोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा महाएपिसोड ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता आणि रात्री ८ वाजता प्रसारित होईल. या भूमिकेबद्दल सांगताना अभिनेत्री दीप्ती केतकर म्हणाली, “एक आई आपल्या मुलीच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभी असते आणि वेळ आल्यास दुर्गेचा अवतार घेण्यासही मागे-पुढे पाहत नाही. आत्तापर्यंत प्रेक्षकांनी अनुप्रियाची मायाळू बाजू पाहिली, पण आता मुलीच्या संरक्षणासाठी तिचे हे वेगळे रूप दिसेल. यासाठी संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आहे.” तसेच आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दीप्ती केतकर यांनी सांगितले की, “माझ्या आयुष्यात आई आणि सासू या दोघींचेही खूप महत्त्वाचे स्थान आहे. कठीण प्रसंगात हार न मानता धैर्याने सामोरे जाण्याची शिकवण मला दोघींकडून मिळाली. त्यांनी माझ्या स्वप्नांना नेहमीच पाठिंबा दिला. नवरात्रीनिमित्त समाजातील वाईट प्रवृत्ती दूर व्हाव्यात, प्रेम आणि सकारात्मकता वाढावी हीच देवीकडे प्रार्थना आहे. त्याचबरोबर प्रत्येक स्त्रीने कुटुंबाची काळजी घेताना स्वतःच्या स्वप्नांकडे दुर्लक्ष न करता स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे आणि स्वतःसाठी जगायला शिकले पाहिजे.”
Source link
'मी संसार माझा रेखिते'त नवरात्री विशेष महाट्विस्ट:लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचे रूप