Headlines

अमरावती एडीसीसी बँकेवर प्रशासक राज सुरू:श्रीनिवास पांढरे प्रशासक म्हणून नियुक्त, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली




अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (एडीसीसी) प्रशासक राज सुरू झाले आहे. सहकार विभागातील सहनिबंधक श्रीनिवास पांढरे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे. बँकेच्या संचालक मंडळाचा ५ वर्षांचा कार्यकाळ ४ ऑक्टोबरला संपला. निवडणूक लांबल्याने प्रशासनात पोकळी निर्माण झाली. अध्यक्ष आमदार बच्चू कडूंसह ११ संचालकांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती, पण न्यायालयाने ती फेटाळली. त्यामुळे प्रशासक राज सुरू झाले. नवीन संचालक मंडळाची निवडणूक होईपर्यंत बँकेचे सर्व प्रशासकीय निर्णय आणि दैनंदिन कामकाज आता प्रशासक श्रीनिवास पांढरे पाहतील. यात बँकांचे व्यवहार, खर्च, कर्जमाफी आणि नव्या कर्जाचे वाटप यांचा समावेश आहे. बँकेचा निवडणूक कार्यक्रमही जाहीर झाला आहे. विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन यांच्या नेतृत्वात प्रक्रिया सुरू आहे. २० सप्टेंबरला प्रारूप मतदार यादी जाहीर झाली, त्यावर १०१ हरकती आल्या. १४ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *