Headlines

गव्हालीमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या:नापिकी, कर्जामुळे तणावात, गळफास घेत उचलले टोकाचे पाऊल‎




सिल्लोड तालुक्यातील गव्हाली येथील २२ वर्षांच्या विठ्ठल दिनकर शिंदे या तरुण शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जाला कंटाळून शनिवारी आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत विठ्ठल शिंदे यांच्यावरच कुटुंबाचा संपूर्ण भार होता. त्यांच्या घरी आई आणि भावजय आजारी असल्याने त्यांच्या वैद्यकीय उपचाराचा मोठा खर्च डोक्यावर होता. त्यातच यंदा पावसाने दगा दिल्याने उभे पीक करपून गेले. शेतातील नांगरणी, बी-बियाणे आणि खतांचा झालेला खर्चही निघणे अशक्य झाले होते. डोक्यावरील कर्ज आणि आजारपणाच्या खर्चाची चिंता यातून आलेल्या नैराश्यातून विठ्ठल यांनी टोकाचे पाऊल उचलले. शनिवारी सकाळी त्यांनी शेतातील गट क्रमांक २५ मधील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. ही घटना निदर्शनास येताच वडोद बाजार पोलीस ठाण्याचे बीट जमादार धनराज खाकरे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. यानंतर त्यांना तात्काळ सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; परंतु तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी वडोद बाजार पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी शोकाकुल वातावरणात विठ्ठल शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *