Headlines

आदिवासी विद्यार्थ्यांना मिळतेय हक्काचे व्यासपीठ:केळी-कोतूळमध्ये तीन दिवसीय केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा; खो-खो, कबड्डी खेळांत विद्यार्थ्यांचा सहभाग‎



दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त क्रीडागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, राजूर अंतर्गत केळी-कोतूळ येथे ९ ते ११ ऑक्टोबरदरम्यान केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय क्

.

स्पर्धेचे उद्घाटन सहाय्यक प्रकल्प अधिकारी मनोज पैठणकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि क्रीडाध्वजारोहणाने झाले. यावेळी केळी-कोतूळचे सरपंच चंद्रकांत भवारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर तळपे, उपाध्यक्ष ज्ञानदेव वायाळ, सदस्य गोविंद गोडे तसेच विविध आश्रमशाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सांघिक भावना, खिलाडूवृत्ती आणि नेतृत्वगुण विकसित व्हावेत, हा स्पर्धांचा मुख्य उद्देश आहे. क्रीडासंस्कृती लहानपणापासून रुजवणे आवश्यक असल्याचे मनोज पैठणकर यांनी सांगितले.

मुख्य आयोजक तथा मुख्याध्यापक गणेशकुमार कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, आरोग्याविषयी जागरूकता आणि क्रीडाभावना वृद्धिंगत करण्यावर भर देण्यात आला आहे. स्पर्धेत खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, हँडबॉल या सांघिक खेळांसह १०० व २०० मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक आणि थाळीफेक अशा मैदानी प्रकारांचा समावेश आहे. विविध खेळांत कौशल्य दाखवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

मैदानावर रंगणार चुरस



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *