Headlines

साडेचार अन् 3 वर्षांच्या मुलींवर‎ बापाचाच अत्याचार; नराधम अटकेत:समुपदेशनानंतर पत्नीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल‎, लातूरमधील अहमदपूर येथील घटना




लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरात माणुसकीला काळीमा ‎‎फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली‎ आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या अवघ्या साडेचार आणि ‎तीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार‎ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ‎‎अहमदपूर पोलिस ठाण्यात नराधम बापाविरुद्ध भारतीय न्याय ‎‎संहिता आणि ”पोक्सो” कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला ‎‎अटक करण्यात आली आहे.‎ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑक्टोबर रोजी‎ मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास आरोपीने हे कृत्य केले.‎मुलींच्या रडण्याचा आवाज आल्याने पत्नीला जाग आली. तिने ‎दिव्याच्या प्रकाशात पाहिले असता, पती आपल्याच मुलींवर‎ अत्याचार करत असल्याचे भयंकर दृश्य दिसले. तिने जाब ‎विचारला असता, आरोपीने पत्नी आणि दोन्ही मुलींना जिवे ‎मारण्याची धमकी दिली. पीडित मुलींच्या आईने सकाळी‎ शेजाऱ्याला हा प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून पीडित मुलींची 27 वर्षीय आईने दुसऱ्या दिवशी एका‎ शेजाऱ्याजवळ घडलेला प्रकार बोलून दाखवला. मुली जखमी‎ असल्याचेही तिने सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्या ‎नागरिकाने थेट जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांना ‎निनावी फोन केला. त्यामुळे प्रकरण उघड झाले. त्या व्यक्तीने तत्काळ जिल्हा महिला व बालविकास‎ अधिकाऱ्यांना निनावी फोन करून माहिती दिली.या माहितीनंतर ‎बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव‎ घेत आईचे समुपदेशन केले व जखमी मुलींना वैद्यकीय ‎उपचारांसाठी दाखल केले. अधिकाऱ्यांच्या मदतीने पीडितेच्या‎ आईने दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेतील कलम ‎65(2), 351(2), 351 (3) तसेच बालकांचे लैंगिक ‎अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) 2012 मधील कलम ‎4, 5 (ड), 5 (एन) आणि 6 अन्वये गुन्हा दाखल केला. हे ही वृत्त वाचा अल्पवयीन मुलीचा बळजबरीने विवाह लावून केला अत्याचार:5 महिन्यांची गरोदर राहिली, पती अन् नातेवाइकांवर गुन्हा‎
नातेवाइकांनीच एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बळजबरीने बालविवाह लावून दिला. त्यानंतर लग्नाच्या नावाने तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे पीडित मुलगी सध्या पाच महिन्यांची गरोदर राहिली असून, तिच्या वैद्यकीय जबाबावरून तामलवाडी पोलिस ठाण्यात पतीसह बालविवाह लावून देणाऱ्या नातेवाइकांवर विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर ‎‎‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *