Headlines

सांजूळ प्रकल्पावरील 107 अवैध विद्युत मोटारींचा वीजपुरवठा खंडित:पिण्यासाठी पाणी आरक्षित, महसूल, महावितरण प्रशासनाची कारवाई‎




फुलंब्री शहरासह ग्रामीण भागाचा मुख्य आधार असलेल्या सांजूळ लघु प्रकल्पातील पाणीसाठा खालावत चालल्याने आगामी काळात गंभीर पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोहीम राबवून प्रकल्पाच्या आरक्षित जलसाठ्यातून सुरू असलेला अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी १०७ अवैध विद्युत मोटारींचा वीजपुरवठा रविवारी खंडित केला आहे. सांजूळ प्रकल्पातील अनधिकृत उपशाबाबत नागरिकांच्या तक्रारींनंतर महसूल, पाटबंधारे विभाग, पोलिस प्रशासन, महावितरण आणि पंचायत समितीच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. पथकाने घटनास्थळी अनधिकृत जलवाहिन्यांचा शोध घेतला आणि महावितरणच्या मदतीने मोटारींचा वीज पुरवठा बंद केला. या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. प्रशासनाचा निर्णय शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत, वीज पुरवठा खंडित केल्यामुळे पिकांचे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. जनावरांसह पिण्याचे पाणी आणायचे कुठून? असा सवाल शेतकऱ्यांनी यावेळी केला. कारवाईमुळे स्थानिक शेतकऱ्यांमधून संताप



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *