Headlines

हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोहटादेवी गडावर भक्तीमय वातावरणात घटस्थापना:ढोल ताशांचा गजर अन् सुवर्ण मुखवट्याची मिरवणूक, भाविकांची अलोट गर्दी‎



‘मोहटादेवी माता की जय’च्या जयघोषात, बँड पथकाच्या आणि ढोल-ताशांच्या गजरात श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर रविवारी शारदीय नवरात्रोत्सवाला पारंपरिक पद्धतीने प्रारंभ करण्यात आला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा उत्साहात पा

.

मोहटा देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ जगताप म्हणाले, मोहटादेवी गड हे पवित्र तीर्थक्षेत्र असून येथे शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. यंदा राज्यात भरपूर पाऊस पडावा, पर्जन्यमान चांगले व्हावे आणि शेतकरी तसेच सर्वसामान्य जनतेच्या सुखसमृद्धीत वाढ व्हावी, यासाठी जगदंबा मातेला साकडे घातले आहे. नवरात्रोत्सवासाठी महसूल, पोलीस आणि धर्मादाय विभागासह संबंधित यंत्रणा भाविकांच्या सोयीसुविधांसाठी सज्ज आहेत असेही त्यांनी सांगितले.

तालुक्यात ठिकठिकाणी घटस्थापना; भाविकांचा उत्साह मोहटादेवी गडासह तालुक्यातील धामणगाव देवी, तिसगाव, येळी, निवडुंगे आणि करंजी येथेही घटस्थापना करण्यात आली. पाथर्डी शहरातील गाडगे आमराई, आराध्याची देवी, चिंचपूर रस्त्यावरील माहूरची देवी, कालिका देवी, श्री चौंडेश्वरी माता, तिळवण तेली समाज मंदिरातील तुळजाभवानी देवी, नवी पेठेतील चौंडेश्वरी देवी मंदिरांत नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *