Headlines

आईराजा उदो उदो!:घटस्थापनेचा मुहूर्त, रविवारची सुट्टी; रेणुका, तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गर्दी, केडगावसह बुऱ्हाणनगरच्या मंदिरात भाविकांचा जनसागर




‘आईराजा उदो उदो… सदानंदीचा उदो उदो…’ च्या जयघोषात रविवारी शहरात आणि उपनगरांमध्ये शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. घटस्थापनेचा पहिलाच दिवस आणि त्याला जोडून आलेली रविवारीची सुट्टी, या दुहेरी योगामुळे नगरकरांचे श्रद्धास्थान असलेल्या केडगावातील श्री रेणुका माता मंदिर आणि बुऱ्हाणनगर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरात भल्या पहाटेपासूनच भाविकांचा अलोट जनसागर उसळला. केडगावच्या रेणुका माता मंदिरात सकाळी ८ वाजता पवित्र अभिषेक, परशुराम पूजन आणि ध्वजारोहण करून विधिवत घटस्थापना करण्यात आली. तर बुऱ्हाणनगर येथे भगत परिवाराच्या वतीने डोक्यावर सुबक घट आणि हातात भगवे ध्वज घेऊन भव्य घटशोभायात्रा काढण्यात आली. दोन्ही मंदिरांमध्ये महाआरतीनंतर देवीच्या मूर्तींना पारंपरिक सुवर्ण व रत्नजडित अलंकारांनी मढवण्यात आले असून, फुलांची नयनरम्य आरास आणि आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला आहे. दुष्काळाचे सावट टळून बळीराजा सुखी व्हावा आणि सीमेवरील जवान सुरक्षित राहावेत, यासाठी देवीच्या चरणी साकडे घालण्यात आले. ^ भाविकांच्या सोयीसाठी बुऱ्हाणनगरच्या तुळजाभवानी मंदिरात मुखदर्शनाची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. नवरात्रकाळात सलग २० तास भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे. तसेच, जे भाविक प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी ‘श्री बुऱ्हाणनगर देवी’ या सोशल मीडिया पेजवरून देवीच्या दैनंदिन दर्शनाची सोय उपलब्ध केली आहे. – अभिषेक भगत, पुजारी केडगावात पहिल्याच दिवशी झालेल्या अभूतपूर्व गर्दीच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने चोख व्यवस्था ठेवली आहे. पहिली, पाचवी आणि सातवी माळ या दिवशी होणारी अलोट गर्दी लक्षात घेता, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन रांगा, तसेच वेळ वाचवण्यासाठी मुखदर्शनाची विशेष व्यवस्था केली आहे. मंदिर परिसरात २० सीसीटीव्ही, भाविकांना दर्शनात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी स्वयंसेवक आणि ४० पोलिसांचा बंदोबस्त तत्पर आहे. नवरात्रातील घट हे विश्व निर्मितीचे आणि सुफलतेचे प्रतीक मानले जाते. सप्तधान्य आणि पाण्याचा तांब्या (घट) स्थापन करून निसर्गाच्या पुनरुज्जीवनाची पूजा केली जाते. बुऱ्हाणनगर आणि केडगाव येथील देवीला चढवले जाणारे दागिने हे पेशवेकालीन व मराठाकालीन नक्षीकामाचे प्रतिनिधित्व करतात, जे वर्षातून केवळ नवरात्रोत्सवातच भाविकांना पाहायला मिळतात. २० तास दर्शन सुविधा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *