![]()
आई श्री एकवीरा देवी संस्थानाद्वारे दर दिवाळीला मेळघाटातील आदिवासी महिला व युवतींसाठी साडी-चोळीची भेट पाठवली जाते. आदिवासींची दिवाळीही चांगली व्हावी म्हणून देवीला ओटीत आलेल्या साड्या या आदिवासी महिला व युवतींना भेट दिल्या जातात. पारधी बेड्यांच्या उत्थानासाठी संस्थानाकडून सातत्याने काम सुरू आहे. खुद्द संस्थानातील पदाधिकारी व एका बाह्य संस्थेच्या मदतीने पारधींना सातत्याने धान्याचे वाटप केले जाते. श्री एकवीरा देवी मंगल कार्यालय हे गरीब व सामान्य नागरिकांना विवाहासह इतर कार्यक्रम घेण्यासाठी उपयोगी ठरले आहे. अत्पल्प दरात ते उपलब्ध करून दिले जाते. यासह त्याच्याच बाजुला धर्मार्थ होमिओपॅथी दवाखाना व फिजिओ थेरेपी सेंटरही चालवले जात आहे. समाजसेवेचा यज्ञ सतत सुरू : विविध प्रकारची सेवाकार्येही सुरु श्री एकवीरा देवी संस्थान सचिव शेखर कुलकर्णी म्हणाले, संस्थानाद्वारे समाजसेवेचा यज्ञ सतत सुरू ठेवण्यात आला आहे. धर्मार्थ होमिओपॅथी दवाखाना, एकवीरा देवी मंगल कार्यालय, भक्त निवास, फिजिओ थेरेपी सेंटर अशी सेवाकार्ये केली जात आहेत.
Source link
ओटीतील साड्यांनी मेळघाटातील महिलांची दिवाळी:गेल्या दोन दशकांपासून राबवली जाते परंपरा, एकवीरा देवीच्या ओटीतल्या साड्या देतात आदिवासी महिलांना भेट