![]()
देशात मतचोरी झाल्याचा गंभीर आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात त्यांनी ‘चलो दिल्ली’चा नारा दिला असून, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. मतचोरीचा आरोप आणि राजीनाम्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी आपल्या पोस्टमधून निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. देशात मतचोरी झाल्याचा गंभीर दावा करत, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि लोकशाहीचे रक्षण सुनिश्चित करावे, अशी काँग्रेसची स्पष्ट मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष यासाठी ठामपणे उभा असल्याचेही ते म्हणाले. तरुणांवरील कारवाईचा तीव्र निषेध सध्या शांततेत आंदोलन करणाऱ्या तरुणांवर पोलिसांकडून कारवाई आणि मारहाणीच्या घटना घडत आहेत. या दडपशाहीचा वडेट्टीवार यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. अशा कारवायांमुळे लोकशाही मूल्यांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, बळाचा वापर करून देशातील जनतेचा आवाज दाबता येणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. सरन्यायाधीशांना करणार हस्तक्षेपाची विनंती या संपूर्ण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली थेट सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे वडेट्टीवार यांनी जाहीर केले. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी भारताच्या सरन्यायाधीशांनी यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी विनंती या मोर्चामार्फत केली जाणार आहे. जोपर्यंत ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतला जात नाही आणि मागण्यांवर ठोस पावले उचलली जात नाहीत, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. “ना घाबरणार, ना झुकणार,” असा निर्धारही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. ————– ही बातमी पण वाचा.. विरोधकांचा आज CEC विरोधात SC पर्यंत मार्च: CJIचा राहुल-खरगेंना भेटण्यास नकार, दोघांनी मागितली होती वेळ; 6 मेट्रो स्टेशन बंद मतदानातील फेरफार किंवा मते चोरल्याच्या आरोपांविरोधात निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेस आणि ‘इंडिया’ (INDIA) आघाडीतील इतर विरोधी पक्ष आज सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढणार आहेत. काँग्रेसने या आंदोलनाला ‘चलो दिल्ली – लोकशाहीसाठी मोर्चा’ (Chalo Delhi – March for Democracy) असे नाव दिले आहे. विरोधी पक्षांचे नेते दुपारी १:३० वाजता कनॉट प्लेस-बाराखंबा रोड जंक्शन येथे एकत्र जमणार आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवेदन सादर करण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश (CJI) यांच्याकडे रविवारी भेटीची वेळ मागितली होती. मात्र, सरन्यायाधीशांनी राहुल गांधी यांना भेटण्यास नकार दिला. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांनी असे सांगितले की अशाच प्रकारची प्रकरणे आधीच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. सविस्तर वाचा
Source link
विजय वडेट्टीवारांचा ‘चलो दिल्ली’चा नारा:राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी