![]()
श्री गुजराती सेवा समितीच्या वतीने अनेक वर्षांपासून मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुंगीलाल गरबा महोत्सवात यंदा माता आराधनासाठी केला जाणारा व संस्कृतीत पावन मानला जाणारा कपल अर्थात युगल गरब्याचा नवा प्रयोग सादर करण्यात येत असल्याची माहिती समितीचे वरिष्ठ उपाध्यक्ष हरीश लाखाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला समितीचे अध्यक्ष वालजी पटेल, अखिल भारतीय गुजराती समाजाचे महाराष्ट्र- गोवा उपाध्यक्ष हेमेंद्र राजगुरु, मनोज भीमजियानी, िदनू सोनी, आशिष वखारिया, अरविंद पटेल, कपिल ठक्कर, महिला मंडळ अध्यक्ष शीतल रुपारेल, अनिषा वखारिया आदी उपस्थित होते. १९ ऑक्टोबरपर्यंत रोज संध्याकाळी ७ वाजता आयोजित या गरबा महोत्सवात गुजरातच्या लोककलेतील प्रसिद्ध गायक, गायिका आणि संगीत मंडळ महोत्सवात आपला पारंपरिक व अभिजात गरबा संगीत मातेच्या आरतीसह सादर करणार आहेत. महोत्सवात रोज महिला आणि पुरुष गरब्यासमवेत आकर्षक कपल गरबा रास आणि फॅमिली गरबा रास हे या आयोजनाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. फॅमिली आणि कपल राससह दररोज गरबा खेळणाऱ्या युवती आणि महिलांनाही पुरस्कृत केले जाईल. महोत्सवात गरबा खेळण्यास व बघण्यास आलेल्या महिलांची सुरक्षा ही सर्वतोपरी राहणार असून यासाठी विशेष सीसीटीव्ही, महिला सुरक्षा रक्षक, तसेच त्यांना बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन हेमेंद्र राजगुरू यांनी केले तर आभार मनोज भीमजियानी यांनी मानले. यावेळी प्रकाश लोढिया, किरीट शाह, अमरीश पारेख, विशाल शाह, पीयूष संघवी, दर्शन शाह, पराग शाह, विनोद धाबलिया, पार्थ वोरा, रोहन काटकोरिया, भारत भाटिया, भरत मकवाना, जगदीश पटेल, संजय कोरडिया, नीलिमा वोरा,नयना कारिया, नर्मदा पटेल आदींसह मोठ्या संख्येने महिला- पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महानगराच्या या सांस्कृतिक वैभवात व पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमापैकी एक असलेल्या या गरबा महोत्सवाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. उत्तम व रंगीत विद्युत व्यवस्था, उत्कृष्ट गुजराती लोकगीते, पारंपरिक संगीत, नित्य आरती व माता पूजन यासारखा वैशिष्ट्यपूर्ण हा महोत्सव असून गरबा महोत्सवात प्रांगणाची आकर्षक अशी विशेष सजावट करण्यात येऊन गरबाप्रेमींसाठी फूड झोन उभारण्यात आले आहे. हेमेंद्र राजगुरु यांनी गरबा महोत्सवाच्या अंतिम दिनी आयोजित “गरबा क्वीन’ स्पर्धेची माहिती दिली. शेवटच्या दिवशी रोज खेळत असणाऱ्या महिलांची अंतिम लढत होऊन यात गरबा क्वीनची निवड करण्यात येऊन त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येत असतात. त्याचप्रमाणे उपविजेत्या महिलेची निवड करण्यात येत असते.
Source link
मुंगीलाल गरबा महोत्सवात यंदा पारंपरिक युगल गरब्याचा प्रयोग:प. विदर्भातील सांस्कृतिक, सामाजिक महोत्सव