![]()
खामगाव फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील श्री गोरक्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अभिजात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत एका विशेष कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य मोहन पाटील सोनवणे यांच्या प्रेरणेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी अध्यक्षस्थानी मोहनराव पाटील हे होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून पुष्पा मोहन पाटील सोनवणे उपस्थित होत्या. या कविसंमेलनात पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी दुष्काळ, भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या, अंधश्रद्धा आणि सामाजिक वास्तव यांसारख्या गंभीर विषयांवर स्वरचित कविता सादर करून आपल्या प्रगल्भ विचारांची चुणूक दाखवली. तसेच शिक्षक गणेश शिंदे, अनिकेत सुरडकर, जितेंद्र काचोळे, रामेश्वर गिते आणि दिगंबर देवरे यांनीही कविता सादर केल्या. यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांना संबोधित करताना मोहन पाटील सोनवणे विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश देत म्हणाले, जिथे जिथे मदत करता येईल, तिथे आपले हात सर्वसामान्यांच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजेत. पैशापेक्षा माणुसकीला महत्त्व देऊन संवेदनशील मनाने जीवन जगले पाहिजेत. शालेय शिक्षणाबरोबर आपल्या विद्यार्थी जीवनात जो छंद आहे तो छंद जोपासला पाहिजे यासाठी या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. मोहन सोनवणे
Source link
आपले हात सर्वसामान्यांच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजेत- मोहन पाटील सोनवणे:श्री गोरक्ष विद्यालयात अभिजात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कविसंमेलन