Headlines

पिंपळगाव रेणुकाईत रस्त्याच्या कामात पाच किलोमीटरची जलवाहिनी उद्ध्वस्त:जुईधरण फाटा ते वालसावंगी रस्त्याच्या कामात जलवाहिनीचे नुकसान‎



भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे ऐन हिवाळ्यातच पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. प्रशासन आणि कंत्राटदारांच्या दुर्लक्षाचा फटका १० हजार ग्रामस्थांना बसत आहे. जुई धरण फाटा ते वालसावंगी या ३५ किलोमीटर रस्त्याच्या कामादरम्यान जलजीवन मिशनअंतर्गत टाकल

.

रस्त्याच्या कामामुळे जलवाहिनीचे नुकसान झाल्यानंतर ती पूर्ववत जोडून देणे अपेक्षित होते. मात्र, वर्षभरात ही दुरुस्ती न झाल्याने जलजीवन मिशनच्या कामाचा उपयोग ग्रामस्थांना मिळालेला नाही. रस्ता बांधण्यासाठी यंत्रे चालली. त्याचवेळी नुकसान झालेल्या पाणीपुरवठा यंत्रणेची जबाबदारी कोण घेणार, याकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, जुई धरणातील पाणीपातळी घटल्याने गावाला सध्या मिळणारा पाणीपुरवठाही संकटात आहे. अशावेळी वर्षभरापासून रखडलेली जलवाहिनी तातडीने जोडून कार्यान्वित करणे गरजेचे आहे. अन्यथा येत्या उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची भीती आहे. संबंधित कंत्राटदाराकडून दुरुस्ती करून घेऊन पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.

वर्षभर दुरुस्ती नाही, दुष्काळात पाणी द्या : रस्त्याच्या कामादरम्यान जलजीवन मिशनची जलवाहिनी खराब झाली; मात्र ती जोडण्याची जबाबदारी असतानाही वर्षभर दुरुस्ती झाली नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. कंत्राटदाराकडून काम करून घेणे आणि त्यावर देखरेख ठेवणे संबंधित विभागाचे काम असताना जलवाहिनी अद्याप बंद का, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा आंदोलन पिंपळगाव रेणुकाईतील पाणीटंचाईवर तातडीने तोडगा काढून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा माजी सरपंच बाबुराव बेराड, शिवा आहेर, समाधान देशमुख, विष्णू आहेर, कमलाकर जाधव आदींनी दिला आहे. आठ-आठ दिवस नळांना पाणी येत नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. प्रशासनाने आता तरी दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *