Headlines

श्री महालक्ष्मी देवीला 2 किलो सोन्याचा रत्नजडित मुकुट:घटस्थापनेच्या मुहूर्तावर नवरात्रोत्सवाचा सुवर्णमयी प्रारंभ




घटस्थापनेच्या मुहूर्तावर पुण्यातील सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरात सार्वजनिक नवरात्रोत्सवाचा अत्यंत थाटामाटात आणि सुवर्णमयी प्रारंभ झाला आहे. या विशेष प्रसंगी देवीला तब्बल 2 किलो सोन्यापासून तयार करण्यात आलेला आणि मौल्यवान रत्नांनी जडलेला भव्य सुवर्ण मुकुट परिधान करण्यात आला आहे. संपूर्ण नवरात्रोत्सवात हा मुकुट भाविकांना पाहण्याची संधी मिळणार असून, तो दर्शनासाठी विशेष आकर्षण ठरत आहे. मुकुटात लक्ष्मी-विष्णू आणि अष्टलक्ष्मींचे मनोहारी रूप या मुकुटाच्या निर्मिती आणि वैशिष्ट्यांबद्दल माहिती देताना मंदिर ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, “या मुकुटामध्ये गरुडावर विराजमान असलेले श्री लक्ष्मी-विष्णूंचे मनोहारी रूप साकारण्यात आले आहे. यासोबतच अष्टलक्ष्मींच्या विविध स्वरूपांचे अत्यंत बारकाईने आणि कलात्मक पद्धतीने चित्रण करण्यात आले आहे.” या मुकुटाची निर्मिती राठोड ज्वेलर्सचे संजय राठोड यांनी केली आहे. मुकुटात वापरण्यात आलेली मौल्यवान रत्ने आणि प्रत्येक देवस्वरूपाच्या भावमुद्रा अत्यंत सूक्ष्मपणे अधोरेखित केल्यामुळे ही संपूर्ण कलाकृती अधिक जिवंत आणि देखणी भासते. उत्कृष्ट सुवर्णकारिता आणि कलात्मक सौंदर्याचा संगम उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल यांनी मुकुटाच्या रचनेचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “मुकुटावर करण्यात आलेले अतिशय सुबक आणि नाजूक नक्षीकाम हे विशेष लक्षवेधी आहे. पारंपरिक धार्मिक संकल्पना, उत्कृष्ट सुवर्णकारिता आणि कलात्मक सौंदर्य यांचा सुंदर संगम या मुकुटामध्ये पाहायला मिळतो.” नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी हा सुवर्ण मुकुट एक पर्वणी ठरत असून, यामुळे श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला आणखी एक दिव्य आणि वैभवशाली स्वरूप प्राप्त झाले आहे. ————- हेही वाचा.. शारदीय नवरात्र: अण्णा महाराज सोनईकरांच्या साक्षात्काराने पावन झालेले संभाजीनगरचे रेणुका माता मंदिर, 200 किलो चांदीचा गाभारा अन् सोन्याचा मुलामा ऐतिहासिक वारसा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरात ऐतिहासिक वास्तू तर आहेतच; पण येथील प्राचीन मंदिरे आणि त्यांच्याशी जोडलेला इतिहासही भाविकांना आकर्षित करतो. शहरातील सिडको एन-9 परिसरात असलेले श्री रेणुका माता मंदिर हे त्यापैकीच एक. ‘प्रतिमाहूर’ म्हणून ओळख असलेल्या या मंदिरात नवरात्रोत्सवात रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण वास्तुरचना, चांदीने मढवलेला आणि सोन्याचा मुलामा दिलेला गाभारा तसेच देवीचा तांदळा यांमुळे या मंदिराला वेगळी ओळख मिळाली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *