केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान आणि नाना चौक परिसरात झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनात सहभागी झालेला बॉलिवूड अभिनेता इम्रान खान आता मोठ्या कायदेशीर पेचात अडकला आ
.
विदेशी नागरिकाचा राजकीय आंदोलनात हस्तक्षेप खपवून घेणार नाही; सोमय्यांचा गंभीर आरोप
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमय्या यांनी इम्रान खानच्या नागरिकत्वावर थेट बोट ठेवले. “इम्रान खान भारतात राहत असला तरी तो भारताचा नागरिक नाही, तो अमेरिकन नागरिक आहे. भारतीय कायद्यानुसार कोणत्याही विदेशी नागरिकाला देशातील अंतर्गत राजकीय चळवळींमध्ये किंवा निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनांमध्ये प्रत्यक्ष भाग घेण्याचा अधिकार नाही. तरीही तो उघडपणे रस्त्यावर उतरून राजकीय सक्रियता दाखवत आहे. हा भारतीय कायद्याचा उघड भंग आहे.”
देशातून हकालपट्टी करण्याची मागणी
“आम्ही पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली असून, संबंधित परदेशी नागरिकावर कायद्यानुसार तत्काळ कठोर कारवाई करून त्याला देशाबाहेर पाठवले पाहिजे. पोलिसांनी याप्रकरणी अधिकृत चौकशी सुरू केली असून, आजच इम्रान खानला पोलीस समन्स बजावणार आहेत.”
सुनियोजित कटाचा भाग
बॉलिवूडमधील काही मंडळींवर निशाणा साधताना सोमय्या म्हणाले, “कधी शबाना आझमी, कधी नसीरुद्दीन शाह, तर आता इम्रान खान… ही सगळी मंडळी एका पूर्वनियोजित आणि आंतरराष्ट्रीय अजेंड्याचा भाग असल्यासारखे काम करत आहेत.”
आंदोलनात काय घडले?; इम्रान खानची पोलीस व्हॅनमधून सेल्फी
मतदार यादीतील कथित त्रुटी आणि ईव्हीएमच्या मुद्यावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी 10 ऑक्टोबर रोजी सीजेपीने मुंबईत मोर्चा पुकारला होता. मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव ऑगस्ट क्रांती मैदानाकडे जाणारे रस्ते बंद केले होते. यावेळी नाना चौक परिसरात पोलिसांनी महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांच्यासह अभिनेता इम्रान खान आणि 400 हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले होते.
‘सामान्य नागरिक’ असल्याचा दावा
ताब्यात घेण्याच्या कारवाईदरम्यान इम्रान खानने माध्यमांना सांगितले होते की, “मी कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा संस्थेचा प्रतिनिधी नसून, एक सामान्य नागरिक म्हणून देशातील व्यवस्थेच्या विरोधात आणि पारदर्शकतेसाठी या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलो आहे.”
पोलिस व्हॅनमधील सेल्फीची चर्चा
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर इम्रान खानने पोलीस व्हॅनच्या आतून काढलेला सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तो फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. मात्र, आता त्याच्या याच भूमिकेवर सोमय्या यांनी त्याच्या अमेरिकन पारपत्राचा आणि नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित करून कायदेशीर कारवाईचा फास आवळला आहे.
परदेशी नागरिकांच्या राजकीय सहभागावरून कायदेशीर पेच
भारतीय व्हिसा नियमांनुसार आणि विदेशी नागरिक नोंदणी कायद्यानुसार, परदेशी नागरिकांना भारतात कोणत्याही राजकीय घडामोडींमध्ये, निदर्शनांमध्ये किंवा सरकारच्या विरोधातील आंदोलनांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्यास सक्त मनाई आहे. या नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांचा व्हिसा रद्द करून त्यांना मायदेशी परत पाठवण्याची कायदेशीर तरतूद आहे. किरीट सोमय्या यांनी हाच तांत्रिक व कायदेशीर मुद्दा उपस्थित केल्यामुळे मुंबई पोलीस इम्रान खानवर काय कारवाई करतात आणि पोलीस समन्स मिळाल्यानंतर इम्रान खान यावर काय स्पष्टीकरण देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
————————————————————-
हेही वाचा…
दिल्लीत पोलिसांच्या वेशातील भाडोत्री गुंड?: संजय राऊतांचा गंभीर आरोप, भाजपचे नकली पोलिस म्हणत टीका

राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांनी आंदोलन सुरू होण्यापूर्वीच आंदोलकांची धरपकड सुरू केली. यावेळी काही पुरुष पोलिसांकडून मुली व महिलांना धक्काबुक्की केल्याचा देखील आरोप केला जात आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी