Headlines

सिद्धेश्वर एक्स्प्रेसवरील दरोड्याचा कट उघड:धाराशिवच्या 9 महिला अटकेत, कुर्डुवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई




सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या धाराशिवच्या नऊ महिलांना रेल्वे सुरक्षा बलाने बुधवारी पहाटे सापळा रचून ताब्यात घेतले. जेऊर ते कुर्डुवाडी दरम्यान बोगीत संशयितपणे वावरणाऱ्या महिलांच्या टोळीचा कुर्डुवाडी लोहमार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला. चौकशीअंती सर्वांवर गुन्हा दाखल करून अटक केली. महिलांच्या हालचाली संशयास्पद बुधवार, २२ एप्रिल रोजी पहाटे ५ ते ५.३० च्या सुमारास मुंबईहून सोलापूरकडे येत असलेली सिद्धेश्वर एक्सप्रेस जेऊर स्थानकावरून सुटली. यावेळी कर्तव्यावर असलेले आरपीएफचे फिर्यादी हरमेंद्र प्रसाद मीना यांना एस-५ या बोगीमध्ये काही महिलांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यांनी तत्काळ सहकाऱ्यांच्या मदतीने या नऊ महिलांना घेरले आणि ताब्यात घेतले. आधी केली रेकी ताब्यात घेतलेल्या महिलांना सोलापूर येथे नेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा या महिलांनी रेल्वेची रेकी केल्याचे समोर आले. प्रवाशांचे दागिने किंवा मौल्यवान ऐवज लुटण्याचा त्यांचा डाव होता. अटकेतील संशयित आरोपी : योगिनी उर्फ उषा येरवंड्या पवार, प्रिया रोहन पवार, ऐश्वर्या उर्फ पूजा पिंटू काळे, शिवानी आर्यन काळे, नेहा रेवण काळे, करीना जालिंदर काळे, सपना मगर भोसले, अश्विनी महेंद्र काळे, कोमल तयास काळे (सर्व रा.भूम-परांडा, जि. धाराशिव). 9 संशयितांकडे दोन कटर, यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल महिलांकडे दोन कटर आढळले. यातील काही महिलांवर कुर्डुवाडी रेल्वे पोलिसांत यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. इतर ठिकाणीही काही जणींवर दौंड, पुणे, अहिल्यानगर रेल्वे पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असते, ही संधी साधून ही टोळी दरोडा टाकणार होती. मात्र, रेल्वे पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे सामान आणि दागिने सुरक्षित राहिले आहेत. पोलिसांच्या या धाडसी कामगिरीचे सध्या सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *