Headlines

तुळजाभवानी मंदिरात संतापजनक प्रकार:प्रवेश नाकारल्याने पोलिसांची सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण! अमानुष मारहाणीत डोके फुटले




तुळजाभवानी मंदिरात नवरात्र महोत्सवादरम्यान एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंदिरात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असताना, पितळी गेटमधून आत प्रवेश देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी मंदिर संस्थानच्या एका सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत सुरक्षारक्षकाचे डोके फुटले असून तो गंभीर जखमी झाला आहे. सध्या नवरात्रोत्सवामुळे तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी अफाट गर्दी लोटली आहे. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि सुरक्षेसाठी मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यादरम्यान, मंदिराच्या पितळी गेटमधून काही जणांना आत सोडण्याच्या मुद्द्यावरून ड्युटीवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्याने नियमांचे पालन करत त्यांना प्रवेश देण्यास नकार दिला. याच गोष्टीचा राग मनात धरून तीन ते चार पोलिस कर्मचाऱ्यांनी संबंधित सुरक्षारक्षकासोबत वाद घातला आणि त्याला बेदम मारहाण केली. पोलिसांची अमानुष मारहाण नियमांचे पालन करणाऱ्या या सुरक्षारक्षकाला पोलिसांकडून अत्यंत क्रूरपणे मारहाण करण्यात आली. पोलिसांनी हातातील कड्याने या सुरक्षारक्षकाच्या डोक्यावर वार केले, ज्यामुळे त्याचे डोके फुटले आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन तो गंभीर जखमी झाला. मंदिराच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यावरच रक्षक असलेल्या पोलिसांकडून असा जीवघेणा हल्ला झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ या घटनेनंतर पीडित सुरक्षारक्षकाने न्याय मिळवण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, मारहाण करणारे आरोपी हे पोलिस दलातीलच असल्याने स्थानिक पोलिस याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत आहेत. आपल्यावर अन्याय झाला असून मारहाणीचा व्हिडिओ पुरावा म्हणून उपलब्ध असतानाही पोलीस दाद देत नसल्याची खंत पीडित सुरक्षारक्षकाने व्यक्त केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *