![]()
शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आज सुनावणी होणार होती आणि शिवसेना शिंदे गटाकडून आपली बाजू मांडली जाणार होती, मात्र आजची सुनावणी ही पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी तीन न्यायमूर्ती आहेत, त्यातील एक न्यायमूर्ती मोहना यांची तब्येत ठीक नसल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत आणि त्यामुळेच आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. तीन पैकी एक जरी न्यायमूर्ती अनुपस्थित असतील तर सुनावणी होत नाही. त्यामुळे आता उद्या ही सुनावणी होते का, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. याचे कारण म्हणजे आठवड्यातून तीन वेळेसच या संदर्भातील सुनावणी होत असते. मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी या संदर्भातली सुनावणी होत असते. दरम्यान मागील सुनावणीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला होता. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील उभी फूट, मूळ पक्षनाव, ‘धनुष्यबाण’ चिन्ह आणि आमदारांच्या अपात्रतेबाबत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात दाखल याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात मागील सुनावणीत शिंदे गटाकडून युक्तीवाद करण्यात आला होता. मागील सुनावणीत काय घडले होते? “राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह हे वाळूच्या कणांसारखे किंवा घड्याळाच्या लंबकाप्रमाणे सतत इकडून तिकडे फिरवता येत नाही. पक्षाचे अधिकृत चिन्ह ही मतदारांची त्या पक्षाशी असलेली भावनिक आणि राजकीय नाळ असते. ज्या दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिला, त्या दिवशी आमच्याकडे विधिमंडळातील स्पष्ट बहुमत, मते आणि प्राथमिक सदस्यत्व शाबूत होते. नंतरच्या कायदेशीर घडामोडींमुळे किंवा भविष्यातील अपात्रतेच्या शक्यतेमुळे आयोगाने घेतलेला अंतिम निर्णय पुन्हा उघडून तपासता येत नाही,” असा जोरदार आणि आक्रमक युक्तिवाद एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी सर्वोच्च न्यायालयात केला. मागील सुनावणीत काय युक्तिवाद झाला होता ते वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
Source link
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली:न्यायमूर्तींच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे निर्णय; शिंदे गटाचा युक्तीवाद लांबणीवर